आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Presented Picture Of Conflict And Inspirational Stories

चित्रातून मांडला संघर्ष अाणि प्रेरणादायी कथा, "लावण्ययोजनम' प्रदर्शनातील कलाकृतींचा वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चित्रांच्या माध्यमातून निसर्गाचे देखणे रूप चितारणे किंवा जीवनातील दु:खद पैलू मांडण्याचे काम चित्रकार सातत्याने करतात. मात्र, आयुष्यातील चढ-उतारात जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा अन्मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अशा वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या प्रतिकृतींचे प्रदर्शन हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या वेलकम आर्ट गॅलरीत भरले आहे.

लातूर येथील नवोदित चित्रकार नितीन मर्डे याच्या कुंचल्यातून साकारलेल्या "लावण्ययोजनम' या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, तर संजीव ऑटो ग्रुपच्या एमडी मैथिली तांबोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. २२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. यापूर्वी लातूर, मुंबई अशा ठिकाणी संघ प्रदर्शनातही त्यांनी चित्रे मांडली होती. त्याची रसिकांनी दखल घेतली आहे. २० चित्रांच्या या प्रदर्शनातील प्रत्येक चित्र आपल्याशी संवाद साधणारे आहे.
अशीमिळाली प्रेरणा : आयुष्यातजेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा नक्कीच उघडलेला असतो. लातूर येथील किल्लारीच्या भूकंपात आईवडिलांना गमावलेल्या नितीन यांच्या पाठीशी समाज उभा राहिला. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसापेक्षा माणुसकी श्रेष्ठ याची प्रचिती त्यांना आली. यातून जगण्याचे बळ मिळाले. त्यामुळेच संकटातून सावरत जीवनाशी लढण्याची ऊर्जा मिळाली. ती नितीनने आपल्या कुंचल्यातून मांडली.

स्वप्न
एकालहान मुलाच्या हातात पुस्तक आहे. १० वी, १२ वी, बीएफए, एमएफए, पदव्युत्तर पदवी असे शिक्षण करताना समाजातील ज्या सर्वांनी साथ दिली त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारा हा मुलगा आहे. चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा ध्यास सोडला नाही. आयुष्यातील विविध रंग या चित्रात त्यांनी उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.

अंतरीचा देव
प्रत्येकातदेव आहे. देव आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीव-निर्जीवात आहे. डोळे बंद असले तरीही तो आपल्याला पाहत असतो, असे सांगणारे हे चित्र. नितीनच्या आयुष्याचा अनुभवही त्यांनी यामध्ये मांडला आहे. तुणतुण्याचे स्वर वारकऱ्यांना भक्तिरसात खोल घेऊन जातात याचाच गंध देणारी ही चित्रकृती.

सोबती
याचित्रातून नितीनने स्वत:चे आयुष्य मांडले आहे. रंग आणि संगीत ही जीवनाची अविभाज्य अंगे आहेत. नितीन यांनी संगीत ऐकत रंगकामात स्वत:ला गढवून घेतले. या चित्रात असलेले हरिण म्हणजे स्वत: मी असल्याचे नितीन म्हणाले. सुरुवातीच्या काळात कुंचला नसल्याने मी पक्ष्यांच्या पिसांपासून, विशेषत: कोंबडीच्या पिसांनी रंगकाम सुरू केले. मोराच्या पिसाने माझ्यातील रंगयोजनेला ऊर्मी मिळाली तर संगीत ऐकतच मी रंगकाम करतो, तल्लीन होतो. म्हणून बासरी यामध्ये दाखवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा प्रदर्शनातील चित्र....