आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती नगरमध्ये; अाज ‘एसीसीएस’ला ध्वजप्रदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शनिवारी नगरच्या आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलला ध्वजप्रदान केला जाणार आहे. ध्वजप्रदानाच्या कार्यक्रमालाच ‘कलर प्रेझेंटेशन’ म्हटले जाते. या कार्यक्रमासाठी शुक्रवारी रात्रीच राष्ट्रपतींचे पुणेमार्गे नगरमध्ये अागमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. 
 
राष्ट्रपतींच्या हस्ते लष्कराच्या एखाद्या विभागाला ध्वजप्रदान करण्याचा क्षण हा अतिशय दुर्मिळ व गौरवाचा असतो. जो विभाग युद्ध व शांततेच्या काळात अतुलनीय निष्ठा व बहुमोल योगदान देत अतिशय मोलाची कामगिरी बजावतो त्यालाच हा गौरव प्रदान केला जातो. 
बातम्या आणखी आहेत...