आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च दाबामुळे झेरॉक्स मशीन जळाले.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-रोहित्रात मोठा आवाज होऊन विद्युत दाब वाढल्यामुळे शनिवारी दुपारी 12.30 वाजता कॅनॉट प्लेस भागातील आठ व्यावसायिकांची लाखाची उपकरणे जळाली. यामध्ये एलसीडी, झेरॉक्स मशीन, कॅमेरे, पॉवर बोर्ड, सेट टॉप बॉक्स, संगणक, बल्ब, ट्यूबलाइट, टीव्ही यांचा समावेश आहे.

कॅनॉट प्लेसमधील व्यावसायिक दर महिन्याला बिलापोटी जीटीएलला 40 लाख रुपये अदा करतात. मात्र, त्यांना सुविधा पुरवण्यात जीटीएल अपयशी ठरले आहे. या भागात उघड्या डीपी आणि लोंबकळलेल्या विद्युत तारा दिसून येतात. काही तारा ठिकठिकाणी जोडलेल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन देण्यात आले आहेत. यामुळे रोहित्रात दर पंधरा दिवसांत काही ना काही बिघाड होतो.

आज घडलेल्या प्रकारामुळे आठ व्यावसायिकांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान असून जीटीएलच्या हट्टवादी वृत्तीला कंटाळलो असल्याचे येथील व्यापारी ज्ञानेश्वर खार्डे म्हणाले. व्यापारी नंदू कावरे, प्रमोद नगरकर, विजय टावरे, सतीश गुळवे, सुधाकर शिंदे, वीरेंद्र जावळे यांनीही वीज उपकरणे जळाल्याबद्दल संताप व्यक्त केला.

खारूताईमुळे घडली घटना

4 11 के.व्ही. विद्युत वाहिनीवर खारूताई चढल्याने स्पार्किंग होऊन घटना घडली. बिघाड झाल्याचे कळताच अधिकार्‍यांनी तत्काळ पुरवठा सुरळीत केला. नुकसानीचा पंचमाना करून अहवाल विद्युत निरीक्षकांकडे पाठवण्यात येईल. समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी.