आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेस कामगारांना रोख पगाराची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने येथील करन्सी नोट प्रेसमधील कामगार दिवसरात्र आणि सुटीच्या दिवशीही देशातील नोटांचा तुटवडा कमी करण्यासाठी नोटांची छपाई करीत आहेत. तसेच, बहुतांश कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क, साखरपुडा, विवाह, औषधोपचार यासाठी रोख रकमेची गरज भासत आहे. मात्र, नोटा छापणाऱ्या कामगारांना पैशांसाठी बँकांबाहेर रांगा लावाव्या लागत असल्याने प्रेस व्यवस्थापनाने नोव्हेंबरचा पगार डिसेंबर महिन्यात रोखीत द्यावा, अशी मागणी माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप आणि कार्याध्यक्ष अशोक गायधनी यांनी केली.
या निवेदनात म्हटले आहे की, बँकेची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी वाजेपर्यंत आहे. या दरम्यान कामगार ड्यूटीवर असल्याने दैनंदिन घरखर्चासाठी सुट्या पैशांची कमतरता भासत आहे. देशासाठी नोटा छपाई करणाऱ्या प्रेस कामगारांनाच सुट्या नोटांसाठी बँकेच्या दारात तासन््तास रांगेत उभे राहण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर २०१६ चा मासिक पगार रोख स्वरूपात आयएसपी आणि सीएनपीच्या कामगारांना देण्यात यावा.

याअाधीही दिले हाेते राेखीत प्रेस कामगारांचे वेतन...
^हानिर्णयघेण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही, कारण यापूर्वी पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर व्यवस्थापनाने आर.बी.आय.ची परवानगी घेऊन प्रेसमधून उत्पादन झालेल्या चलनातून १९९७ मध्ये रोख स्वरूपात वाटप केलेले होते. -रामभाऊ जगताप, माजी जनरल सेक्रेटरी

बातम्या आणखी आहेत...