आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंंडू कवडीमोल; चमेली, जुई, मोगरा, शेवंतीला चांगला दर, सकाळनंतर आवक वाढताच गडगडले दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दसऱ्याच्या दिवशी घसघशीत भाव मिळाल्यामुळे सुखावलेल्या झेंडू उत्पादकांवर दिवाळीत मात्र हिरमुसण्याची वेळ आली आहे. झेंडूचे दर गडगडल्यामुळे या उत्पादकांना कवडीमोल फुले विकावी लागली. 
 
पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी ७० रुपयांंपर्यंत विकला गेलेला झेंडू गुरुवारी सकाळी ३० रुपयांवर घसरला. दुपारी गजानन महाराज मंदिर चौकात अवघ्या १० रुपये किलो दराने झेंडूची फुले विकली जात होती. दर गडगडल्यामुळे फुलांचा ढीग टाकून निघून जाण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली. दुसरीकडे चमेली, जुई, मोगरा, शेवंतीची फुले दिवसभर भाव खात होती. 
 
लक्ष्मीपूजन आणि पाडव्यानिमित्त घरांना झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. वाहनांनाही हार घालण्याची परंपरा आहे. यासाठी पीरबाजार, संग्रामनगर उड्डाणपूल, उस्मानपुरा सर्कल, क्रांती चौक, गजानन महाराज मंदिर चौक, छावणी, टीव्ही सेंटर, त्रिमूर्ती चौक, एन-७, मुकुंदवाडी, हर्सूल टी-पाॅइंट या ठिकाणी बुधवार दुपारपासून विक्रेते दाखल झाले होते. संध्याकाळपर्यंत झेंडूने ७० ते ८० रुपयांपर्यंत उचल खाल्ली. मात्र, रात्रीतून हर्सूल, सावंगी, फुलंब्री, चितेगाव, पैठण, कुभेपिंपळगाव या भागातून फुलांची आवक झाली. यामुळे गुरुवारी फुलांचे भाव एकदम कोसळले. ११ वाजेपर्यंत तर झेंडू ४० रुपयांवर आला होता. तर अनेक जणांनी २५ ते ३० रुपये दराने झेंडूची विक्री केली. दुपारी नंतर अनेक विक्रेत्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. काही जणांनी मिळेल तो भाव पदरात पाडून घेत फुलांची विक्री केली. संध्याकाळपर्यंत अनेक शेतकरी माल टाकून निघून गेले. 
 
मोगरा ९०० रुपये किलो 
झेंंडूचेदर कोसळले असले तरी चमेलीची फुले २०० ते ३०० रुपये किलोने विकली गेली. जुईच्या फुलांचे दर प्रतिकिलो ८०० रुपयांवर पोहोचले होते. मोगराही ८०० ते ९०० रुपयांनी मिळत होता. शेवंतीची फुले १२० ते १५० रुपये किलो होती. सुटे गुलाब ते रुपयांत विकले गेले. 
 
झेंडूने दगा दिला 
पीरबाजारातील फूल विक्रेत्या संगीता जाधव म्हणाल्या, सलग वर्षे झेंडूनी दगा दिला. माल सोडून जावे लागले. यंदा चांगली स्थिती असेल अशी अपेक्षा होती. अनेक ठिकाणी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे तयार माळा उपलब्ध होत्या. बुधवारी ८० रुपयांनी माल विकला. मात्र, गुरुवारी निराशा झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...