आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Primary Health Centers In District Will Be Online

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही होणार ऑनलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सर्वप्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आशांसेविकांचे काम हे आता लवकरच ऑनलाइन दिसणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन विभागाला नुकतेच पत्र प्राप्त झाले असून त्यांच्याकडून आता तालुकास्तरावर प्रशिक्षण घेण्याचेही काम झाले सुरू आहे. बुधवारी अंबाजोगाईमध्ये याचे प्रशिक्षण पार पडले आहे.

राज्यात सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. याच धर्तीवर आता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आशा सेविकांच्या कामासंदर्भातील माहितीचा डाटाही संकलित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. माहिती संकलित करण्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकाउंटंट नसल्याने यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यावर या प्रक्रियेत ग्रामपंचायत ऑनलाइन करण्याचा अनुभव असलेल्या संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) यंत्रणेला सहभागी करून त्यांच्या माध्यमातून सर्व माहिती संकलित करून घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय मुंबईहून घेण्यात आल्यानंतर जिल्हास्तरावर पत्र पाठवून तो कळवण्यात आला. त्याबाबतचे पत्र नुकतेच एनआरएचएमला विभागाला प्राप्त झाले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत एक बैठक घेण्यात आली. त्यानंतर तालुकास्तरावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. विभागीय स्तरावर दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मराठवाड्यातील जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण घेण्याची तयारी सुरू झालेली असून गुरुवारी उस्मानाबादेत कार्यशाळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली प्राप्त झाली आहे.

२८० - उपकेंद्रे जिल्हाभरात
५० - आरोग्य केंद्रे जिल्हाभरात

बैठकीनंतर काम
जिल्ह्यातीलप्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ऑनलाइन करण्यासंदर्भाने एक बैठक जिल्हा परिषदेत नुकतीच झाली आहे. आता आरोग्य विभाग आणि संग्राममध्ये समन्वय साधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर त्यानंतर ऑनलाइनचे काम सुरू होईल.'' राहुल भोसले, जिल्हासमन्वयक, संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र)

रेकॉर्ड तयार राहणार
आशांच्याकामांसंदर्भातील नोंदी करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. त्या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन कामाची नोंद आता ऑनलाइन दिसणार आहे. दररोजच्या कामाच्या तपशिलाची नोंद राहणार आहे. यशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ओपीडी, आयपीडी, प्रसूती इतर आजार, औषधांचा साठा आदी संदर्भातील माहितीही आता ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमातून संकलित झालेली दिसेल.