आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Come Within Five Years At Adgoan Mp Chandrakant Khaire

पंतप्रधानांना पाच वर्षांत आडगावला आणणार- खासदार चंद्रकांत खैरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुक्यातील आडगाव भोसले येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरित असलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ सोमवार, ८ रोजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपविभागीय कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी खैरे म्हणाले की, पाच वर्षांच्या आत आडगाव भोसले हे गाव बघण्यासाठी आपपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी एका दौ-यात स्वच्छतागृहाची योजना व्यक्त केली होती. ती योजनाही प्रभावीपणे राबवणार असल्याचे खैरे म्हणाले.

निधीची कमी पडणार नाही
गावात खूप समृद्धी म्हणजे आदर्श गाव, या आदर्श गाव योजनेसाठी ४६ खात्यांमार्फत २२० योजना असून दोन वर्षांचा कालावधी आहे. एका वर्षात संपूर्ण योजना राबवून आदर्श गाव करणार आहे. कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडणार नाही. शेतीचे आधुनिकरण होणे आवश्यक असून स्थानिकांची मदत हवी असल्याचे जिल्हाधिका-यांनी त्यांनी स्पष्ट केले.