आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच औरंगाबादेत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादेत येण्याची शक्यता आहे. विद्यापीठ परिसरातील स्पोर्ट्स अँथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) अत्याधुनिक स्पोर्ट्स क्लबचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. ‘साई’कडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीनेही नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी पीएमओला निमंत्रणाचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय शहरातील गुजराथी विकास मंडळानेही त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला असून त्याचे निमंत्रणही पाठवले आहे. मोदी औरंगाबादेत येऊ शकतात.

‘साई’चे संचालक वीरेंद्र भांडारकर म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याची निश्चित तारीख सोमवारी कळणार आहे. हेडगेवार रुग्णालयाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी पाठवलेल्या निमंत्रणाला अद्याप उत्तर मिळालेले नाही, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी दिली.