आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prisoner Died In HarsoolJail, Atrocity Filed Aginst Officers

कैद्याचा कोठडीत मृत्यू, अधिका-यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काकासोबत झालेल्या भांडणामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या शिवाजी लक्ष्मण जाधव या कैद्याचा गुरुवारी हर्सूल कारागृहात मृत्यू झाला. कारागृह व पिशोर पोलिस ठाण्यातील कर्मचारी-अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप भाऊ पोपट व संजय जाधव यांनी केला. त्यानुसार शुक्रवारी औरंगाबादेतील बेगमपुरा ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरणे (३०६) व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरोपांनुसार, पिशोर ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर यांच्यासह ५ कर्मचाऱ्यांनी शिवाजीला ३० सप्टेंबरला कोर्टात शिव्या दिल्या.
महिलांना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच घेत आणखी १० हजार दिल्यास तर शिवाजीला सोडू, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पैसे न दिल्याने त्यांनी शिवाजीची कोठडी मागितली. हर्सूल जेल कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा मनस्ताप होऊन शिवाजीचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले. छातीत चमक निघाल्याचे शिवाजीने सांगूनही कर्मचा-यांनी दवाखान्यात नेण्यास उशीर केला. आम्ही त्याचा जामीन मंजूर करून जामीनपत्राची प्रत हर्सूल प्रशासन टपालात टाकली होती. तरीही त्याची मुक्तता करण्यास दिरंगाई झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपात तथ्य नाही
मृताच्या भावाने केलेले आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही पैसे मागितले नाहीत. महिलांना सोडले कारण त्यांच्या अटकेसाठी आमच्याकडे महिला पोलिस नव्हत्या, अटकेपूर्वी शिवाजीचे मेडिकल करण्यात आले होते. त्यावेळी काहीच आढळले नव्हते. घटना कारागृहात कशी घडली हे मला माहिती नाही. प्रफुल्ल अंकुशकर, स.पोलिस निरीक्षक