आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना 'रिमोट'वर महाराष्ट्र चालवू देणार नाही, मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र सरकार मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये हलवत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे गुजरातचा कारभार रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून हाकत आहेत. त्याप्रमाणेच महाराष्ट्रदेखील त्यांना ह्यरिमोटह्णवर चालवायचा आहे; पण मोदींचा हा डाव हाणून पाडू, असे मत मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची गुरुवारी (९ ऑक्टोबर) आमखास मैदानावर प्रचारसभा झाली, त्या वेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 1995-1999 पर्यंतच्या युती सरकारमध्ये जनतेला खंडणीखोरांमुळे हैराण व्हावे लागले. जातीय दंगलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली होती. त्यामुळे उद्योगांनीही येथून पळ काढला. त्याउलट मागील पंधरा वर्षांत विशेषत: पाच वर्षांत राज्य
सरकारने खूप विकास केला. त्यामुळे काँग्रेस सरकारला स्पष्ट बहुमत देऊन राज्यात सरकार आणाह्ण असे आवाहनही त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा हा शैक्षणिक, कृषी आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. शिवाय पुरोगामी मराठवाड्यातर्फे सर्वाधिक आमदार काँग्रेसचेच निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना प्रदेशाध्यक्ष ठाकरे म्हणाले, एनडीए आणि युतीच्या काळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा ह्यड्रामाह्ण करणारे मोदी जेम्स लेनने महाराजांवर घृणास्पद लिखाण केले होते, त्या वेळी कुठे गेले होते. जेम्स लेनच्या पुस्तकासंदर्भात त्यांच्याच पक्षातील नेत्यांची तोंडे गप्प होती. ह्यपूर्वह्णचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भाषणातून शहरातील विकासकामांची उजळणी केली. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा, सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार, ह्यमध्यह्णचे उमेदवार एम. एम. शेख, पक्षांतर करून काँग्रेसमध्ये आलेले कदीर मौलाना आदींची सोनिया गांधी सभास्थळी येण्यापूर्वी भाषणे झाली. काँग्रेस सेवादलाचे चंद्रकांत दायम्मा, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे तसेच विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कदीर मौलाना स्वगृही परतले
राष्ट्रवादीने ह्यमध्यह्णमधून उमेदवारी नाकारलेले अल्पसंख्याकचे माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना यांनी सोनिया गांधी सभास्थळी येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले.मनपाचे माजी स्वीकृत नगरसेवक सुरजितसिंग खुंगर, नगरसेवक अक्रम पटेल, जुबेर गाझी, खलील खान, इसा कुरेशी,शाकीर खान अन्वर खान यांचाही प्रवेश झाल्याचे दर्डा यांनी जाहीर केले.
क्षणचित्रे
सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टरने ४.४५ वाजता आगमन. ४.५२ वाजता व्यासपीठावर विराजमान, ५.०४ मिनिटांनी भाषणास सुरुवात.
तत्पूर्वी सायंकाळी ४.२० वाजता रिमझिम पावसाची हजेरी, उपस्थितांमध्ये चलबिचल, पंधरा मिनिटांनी पाऊस थांबला, मतदार मात्र बसून होते.
जात, पात, धर्म, संप्रदायाच्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेसला मते देऊन विकासाचे साक्षीदार होण्याचे सोनिया गांधी यांचे मतदारांना आवाहन.
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते डॉ. मनमोहनसिंग यांच्यादरम्यान सर्व पंतप्रधानांनी केलेल्या विकासाचा मांडला लेखाजोखा.
काँग्रेसने केलेल्या ६० वर्षांतील कारभाराबाबत सर्टिफिकेट देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचेही गांधी यांचे टीकास्त्र.
महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी ह्यमुंगेरीलाल के हसीन सपनेह्ण असे वाक्य उच्चारून मोदींवर केली टीका.
राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी वेळेअभावी भाषण करण्याचे टाळले.
भाषण संपल्यानंतर नेहमीप्रमाणे सोनिया गांधी यांनी सुरक्षा कवच तोडून लोकांशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून आला. सोनिया गांधी यांचा त्यांनी मर्यादितच जयघोष केला. मोदी, उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत गर्दी कमी असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
सभा संपल्यानंतर उमेदवारांचा परिचय देण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवात केली. मात्र, मतदारांनी उठून जाणे पसंत केले होते. गांधी या मात्र सर्वांना बसवण्यास इशारा करत होत्या.