आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private English School,Latest News In Divya Marathi

‘आरटीई’प्रमाणे प्रवेश; इंग्रजी संस्थाचालकांची मेळाव्यात एकमुखी मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आरटीईनुसार खासगी इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्क्यांप्रमाणे प्रवेश देणा-या शाळांना शासनाने 2012-13 मध्ये 12 हजार 315 रुपये तर 2013-14 या वर्षात 14 हजार 621 रुपये प्रतिविद्यार्थीप्रमाणे निधी मंजूर केला. मात्र, प्रत्येक शाळांच्या शुल्कात तफावत आहे. सर्व शाळांना एकसमान शुल्क मंजूर करणे चुकीचे असल्याने प्रत्येक शाळेच्या निर्धारित शुल्काप्रमाणे खर्च देण्याची मागणी इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेने मेळाव्यात केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बालकांच्या मोफत सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये शासन आदेशाप्रमाणे मुलांना प्रवेश देण्यात आले होते. मात्र, त्याचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. या मागणीसह इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संस्थाचालकांच्या मेळाव्याचे आयोजन शनिवारी हॉटेल विंडसर कॅसल येथे करण्यात आले होते. शासनाने प्रवेशानंतर ऑगस्टमध्येच शुल्काचा पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यात तीन वर्षांपासून एक रुपयाही संस्था चालकांना देण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वीच शासनाने आरटीईप्रमाणे प्रवेश देणा-या शाळांसाठी निधी मंजूर केल्याची सूचना क ाढली आहे. त्यात पहिल्या वर्षी 12 हजार 315 तर दुस-या वर्षात 14 हजार 621 रुपये प्रतिविद्यार्थीप्रमाणे रक्कम मंजूर केल्याचे म्हटले आहे. तसेच 19 टक्के प्रवेश दिल्याची चुकीची आकडेवारी शिक्षण विभागाने शासनाकडे पाठविली असल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला. त्यामुळे खरी माहिती घेऊन विद्यार्थ्यांची संख्या ठरवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संघटनेचे सचिव आनंद सूर्यवंशी, प्रल्हाद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या आहेत प्रमुख मागण्या
प्रवेशाची थकीत रक्कम तत्काळ द्यावी
इतर शाळांप्रमाणे शालेय पोषण आहार द्यावा.
इमारतीला व्यावसायिक व इतर कर लावू नयेत
व्यावसायिक लाइट बिल लावू नये
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके देण्यात यावी
प्रवेश नर्सरीपासून की पहिल्या वर्गापासून द्यावा हे स्पष्ट करावे.