आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही शाळा सुरू, तर काही बंद आंदोलनाबाबत संघटनांत द्वंद्व!, आजही आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खासगी विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे आदी मागण्यांयाठी विविध संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या शाळा बंदच्या आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. ९५ टक्के प्रतिसादाचा दावा संघटनांनी केला असला तरी काही शाळांनी विद्यार्थी हित जपत सहभाग नोंदवला नाही. दरम्यान, सहभागी झालेल्या शाळांकडून बुधवारी शाळा बंद राहणार असल्याचा निरोप वेळेवर मिळाल्यामुळे विद्यार्थी पालकांची धावाधाव झाली. दुसरीकडे सकाळी सुुरू झालेल्या शाळाही काही वेळानंतर बंद करण्यात आल्या.
शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत आंदोलने करूनही शासन सकारात्मक निर्णय घेत नाही. शिवाय शिक्षक आणि शिक्षकांशी चर्चाही करत नाहीत. या निषेधार्थ सर्व संघटनांनी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढत १० डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सुरू झालेल्या या आंदोलनात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळता विनाअनुदानित मराठी शाळांचा समावेश राहणार होता. मात्र, सहभाग वाढवण्यासाठी संघटनांनी अनेकवेळा आवाहन करूनही बुधवारी काही मराठी शाळा सुरू होत्या. यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी या शाळा बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान, खासगी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगपुरा परिसरातील शारदा मंदिर शाळेसमोर निदर्शने केली. या वेळी प्रा.दिनकर बोरीकर,वाल्मीक सुरासे,एस.पी.जवळकर आदी उपस्थित होते.

अशाआहेत मागण्या
अनेकवर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन सुरू करावे, राज्यातील २०१३ पासून घोषित केलेल्या अघोषित शाळा, अनुदान पात्र प्राथमिक,माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना अनुदान द्यावे, २८ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी, नियमित सुरू असलेल्या खासगी शाळांतील शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, विनाअनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, अल्पसंख्याक शिक्षण संस्थेचे मूलभूत अधिकार भारतीय घटनेप्रमाणेच ठेवावेत, शिक्षक भरती सुरू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारीही आंदोलन सुरू राहणार असून सर्व शाळा यात सहभागी होतील, कडकडीत बंद पाळला जाईल, असे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

नंतरबघू म्हणत टाळले
शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी बुधवारी शिक्षण क्षेत्रातील समस्या जाणून घेणे सोडा शिक्षकांशी चर्चा करणेही टाळले. किमान आज तरी आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी दखलही घेतली नाही. काही दिवसांपासून अनेक शिक्षक कुटुंबीयांसह नागपुरात आंदोलन करत आहेत. याकडेही सर्वांचे दुर्लक्ष झाले. नागपुरात आलेल्या शिक्षकांनी गराडा घालताच "नंतर बघू' म्हणत इतर सहकाऱ्यांना "शिक्षकांचे म्हणणे ऐका' असे सांगून ते निघून गेले, अशी माहिती कॉँग्रेस शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
आंदोलनामुळे शाळांचे व्हरांडे असे ओस पडले होते.

विद्यार्थी बेजार; पालकांची धावाधाव
संघटनांच्यारेट्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या शाळातील मुलांना काही वेळानंतर लगेचच सोडून देण्यात आले. परंतु शाळांच्या निर्णयाबाबत यापूर्वी निरोप मिळाल्यामुळे पालकांना धावाधाव करावी लागली. बंदमध्ये सहभागी झालेल्या शाळांमध्ये मात्र सकाळपासूनच शुकशुकाट होता.
बातम्या आणखी आहेत...