औरंगाबाद - कारदुरुस्तीच्या अभ्यासक्रमासाठी मर्सिडीझ बेंझ इंडिया कंपनीने औरंगाबादच्या केंद्राला प्रथमच महिला प्रशिक्षक दिली आहे. अत्यंत अद्ययावत अशा मर्सिडीझ कारच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण वीसवर्षीय प्रियंका पवार देणार आहे.
मर्सिडीझ बेंझचे भारतात पुणे, त्रिवेंद्रमनंतर देशातील तिसरे दुरुस्ती केंद्र औरंगाबादला दिले. या केंद्रात प्रशिक्षण देणारी प्रियंका ही पहिली महिला ट्रेनर ठरली आहे. मर्सिडीझ बेंझ इंडिया प्रा. लि. ही कंपनी पुण्यातील चाकण येथे आहे. भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता पाहून कंपनीने देशात तीन दुरुस्ती प्रशिक्षण केंद्रे दिली. यात पहिले केंद्र पुण्यात सुरू झाले, तर दुसरे केंद्र २००९ पासून औरंगाबादेतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू करण्यात आले. येथील प्राध्यापक वर्गच सुरुवातीला देशभरातून प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. मात्र, या प्राध्यापकांच्या बदल्या होत असल्याने हा अभ्यासक्रम बंद पडला होता. याचा वृत्तांत "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध करताच हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू झाला. मर्सिडीझ बेंझचे उपाध्यक्ष देवदत्त चंदावरकर यांनी या अभ्यासक्रमाबाबत पुढाकार घेत मर्सिडीझचे नाव खराब होऊ नये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे शिकता यावा यासाठी स्वतंत्र प्रशिक्षकच देण्याचा निर्णय घेतला. यात प्रियंका पवार ही औरंगाबादची तरुण प्रशिक्षक कंपनीने निवडली.
जेथूनपदवी मिळवली तिथेच बनली प्रशिक्षक : प्रियंकानेशासकीय तंत्रनिकेतनमधूनच मर्सिडीझ ट्रेनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कंपनीने संस्थेच्या प्राचार्यांकडून उत्तम विद्यार्थ्यांचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. संस्थेने काही गुणवंत विद्यार्थ्यांची यादीही पाठवली. मात्र, कंपनीने प्रियंकाच्या नावे असलेले सीईडीटीची पदवी आणि त्यानंतर मर्सिडीझच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता बघता तिला प्रशिक्षक म्हणून नेमले. तिला कंपनीने पुण्यातील चाकण येथील कंपनीचे प्रशिक्षण देऊन नवे प्रशिक्षक तयार करण्यासाठी औरंगाबादला पाठवले.
कायआहे अभ्यासक्रम : मर्सिडीझबेंझने अॅडव्हान्स डिप्लोमा इन अॉटोमोटिव्ह मेकॅट्रानिक्स हा एक वर्षाचा प्रगत पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे. यासाठी किमान तंत्रनिकेतनची पदवी आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम देशपातळीवरील विद्यार्थ्यांसाठी असून पूर्वी केवळ २० जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ करून ४० करण्यात आल्या आहेत. आजवर ११० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून देशातील मोठ्या कंपन्यांसह विदेशात नोकरी मिळवली आहे.
सामंजस्य करार
-मर्सिडीझकंपनीसोबत २०१७ पर्यंत प्रशिक्षणाचा करार असून त्यांनी आम्हाला सुमारे कोटी रुपयांची लॅब तयार करून दिली आहे. लवकरच या केंद्राचा विस्तार केला जाणार असून तीन प्राध्यापकांना प्रशिक्षणासाठी कंपनीत पाठवण्यात येणार आहे. प्रशांतपट्टलवार, प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन
नोकरीची चांगली संधी
-याअभ्यासक्रमाची फारशी माहिती मराठवाड्यातील मुलांना नाही. हे केंद्र औरंगाबादेत आले असून मराठवाड्यातील मुलांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची चांगली संधी मिळते. प्रियंका येथीलच विद्यार्थिनी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. महेशशिवणकर, सहसंचालक,तंत्रशिक्षण