आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूसंपादनानंतरही रखडला तिसगाव-मिटमिटा बायपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सावंगी-मिटमिटा रस्ता भूसंपादनाअभावी थांबल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे तिसगाव ते मिटमिटा या बायपासचे काम भूसंपादन होऊनही रेंगाळले आहे. काम लवकरच सुरू होणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असला तरी काम लांबत असल्याने नगर रस्त्यावरील किमान पाच हजार वाहने गरज नसताना शहरात दाखल होत आहेत.


अहमदनगरकडून येणारी वाहने वैजापूर, खुलताबाद-वेरूळकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. सद्य:स्थितीत या रस्त्यावर गुडघाभर खड्डे असून फक्त अवजड वाहनेच येथून आगेकूच करू शकतात. ‘दिव्य मराठी’च्या पथकाने या रस्त्याने प्रवास केला असता अवघे सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल 40 मिनिटे लागली. कारण काही ठिकाणी रस्त्याच्या नावाखाली फक्त माती पडलेली दिसते. काही ठिकाणी खडीकरण झाले आहे. भूसंपादन झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने चर खोदून ठेवले आहेत. दोन्ही बाजूंच्या चºयांमधून वाहने प्रवास करतात.


अवजड वाहनांचा खोळंबा : या रस्त्यावरून चारचाकी वाहने फारशी जात नाहीत. मात्र, औरंगाबाद शहरात येण्याचे टाळून वैजापूरकरडे जाणारी अवजड वाहने यावरून जातात. हा रस्ता झाला तर वाळूज औद्योगिक वसाहतीकडून धुळे, खुलताबाद, वेरूळकडे जाणारी वाहने शहरात येणार नाहीत. सध्या ही वाहने नगर नाक्यापर्यंत येऊन मिटमिट्याकडे वळतात.


वाहनचालकांची फसगत : शरणापूर फाट्यापासून रेल्वे फाटकापर्यंत रस्ता चकाचक आहे. त्यामुळे अनेक वाहने तिकडे वळतात. मात्र रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर लगेच खड्डे दिसू लागतात अन् येथेच फसगत होते. भांगसीमाता डोंगराकडे जाणारा रस्ता तुलनेने चांगला आहे. एएस क्लब ते तिसगावपर्यंतचा रस्ता चार लेनचा आहे. तो पुढे लासूर स्टेशनकडे जातो.


मात्र, मिटमिट्याकडे वळण घेताच शहराचे दुर्दैव समोर दिसते. संपादनाची अडचण होती. पूर्वी काय झाले हे मी सांगू शकत नाही. आता निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. दुबे यांनी म्हटले आहे.


दरम्यान, हा रस्ता व्हावा यासाठी मी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. मात्र कोणीही लक्ष न दिल्याने गेल्या 6 वर्षांपासून फक्त खड्ड्यांचा रस्ता दिसतो, असे तिसगाव फाटा येथील व्यावसायिक हर्षल चौधरी यांनी म्हटले आहे.