आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फोन कॉलवर मिळेल प्रत्येक कामातील अडचणींवर उत्तर, विश्व हिंदूपरिषदेची २४ तास हेल्पलाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरकारी कार्यालयात काम अडलेय? घरातील आजारी सदस्याला आरोग्य सेवा हवीय? पर्यटनाला गेलात, पण निवासाची सोय होत नाही, कायदेशीर मदत हवी आहे? अशाच अनेक समस्यांवर आता विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू हेल्पलाइनवर एका फोन कॉलवर समाधान मिळू शकेल. हेल्पलाइनवर राज्यभरातून अशाच समस्यांवर समाधान शोधण्यासाठी दिवसाकाठी १५० ते २०० फोन कॉल्स येत आहेत. यात औरंगाबादच्या १० ते १२ कॉलचा समावेश आहे. 

नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्वच तक्रारींवर उपाय शोधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या संकल्पनेतून हिंदू हेल्पलाइन सुरू करण्यात आली. याचे मुख्यालय पुण्यात औंध येथे आहे, तर प्रत्येक जिल्ह्यात प्रभारी नेमलेले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीच हेल्पलाइनवर आलेल्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करतात. औरंगाबादेत हेमंत त्रिवेदी हेल्पलाइनच्या देवगिरी प्रांताचे प्रभारी म्हणून काम बघतात. 

एका कॉलवर समाधान : हेल्पलाइनवरपाच प्रकारच्या अडचणींवर समाधान सांगितले जाते. यात आरोग्य, प्रवास, शासन-प्रशासन, कायदा आणि धार्मिक यांचा समावेश आहे. हिंदू हेल्पलाइनच्या ०२०-६६८०३३०० किंवा ०७५८८६८२१८१ या क्रमांकावर कॉल केल्यास पुण्यातील कॉल सेंटरमधील प्रतिनिधी अडचण विचारतात. यानंतर एक तर संबंधित जिल्ह्यातील प्रभारींचा क्रमांक देतात. किंवा थाेड्या वेळाने ज्या ठिकाणी मदत हवी तिथल्या प्रतिनिधीचा फोन येतो. 

अडचणीप्रमाणे संबंधित प्रतिनिधी त्यावर समाधान सांगतात. हेल्पलाइनकडे प्रत्येक विषयातील तज्ज्ञांची टीम आहे. गरज पडेल तेथे स्वत:हून तक्रारदारास तज्ज्ञाकडे घेऊन जातात. समस्येचे पूर्ण समाधान होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे सोडत नाहीत. पुण्यात दिवसाकाठी १५० ते २०० फोन कॉल्स येतात, तर औरंगाबादशी संबंधित १० ते १२ असतात. सर्वाधिक कॉल आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असतात. यापाठाेपाठ धार्मिक स्थळांवर मदतीची मागणी करणारे कॉल येतात. काही कॉल धर्मातील विविध संकल्पनांबाबत शंका विचारणारेही असतात. 

काश्मीरच्या मुलांना मदत : औरंगाबादहा पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असल्याने सर्वाधिक कॉल याबाबतचे असतात. काश्मीरहून आलेल्या १२ मुुलांना हेमंत त्रिवेदी यांनी निवास आणि औरंगाबाद दर्शनाची सोय केली होती, तर शनिवारी गुजरातच्या शाळेतील ५६ मुलींसह १२० जण शहरात आले होते. घृष्णेश्वर, वेरूळ, शिर्डी, शिंगणापूर, महाबळेश्वर, लोेणावळा असा त्यांचा प्रवास होता. त्रिवेदी यांनी अत्यंत किफायतशीर दरात त्यांची वेरुळात सोय केली. 

जीवन सुकर करण्याचा प्रयत्न 
हिंदू हेल्पलाइनचे प्रभारी म्हणून आम्ही समस्या आणि त्याचे समाधान यांच्यातील समन्वयक म्हणूून काम करताे. नवीन ठिकाणी कोणाची फसगत होऊ नये, त्याच्या जीवनात आनंद मिळावा, प्रत्येकाचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी हेल्पलाइनवर समाधान सांगितले जाते- हेमंत त्रिवेदी, प्रभारी, हिंदू हेल्पलाइन, देवगिरी प्रांत