आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या नावाखाली नफेखोरी: महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण सहसंचालकांची टोलवाटोलवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून पार्किंगसाठी पैसे घ्यावेत की नाही, याबाबत शिक्षण विभागाचे कोणतेही नियम नसले तरीही ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा असायलाच हवी. वाहन सुरक्षेच्या नावाखाली नफेखोरी करणे आणि आर्थिक हित साधणे चुकीचेच आहे. 
 
महाविद्यालयाला सरकारने जर लीजवर जागा दिली असेल तर पार्किंग शुल्क उकळणे नियमबाह्यच आहे, असे महाविद्यालयांचे नियमन नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या शिक्षण उपसंचालक, उच्च शिक्षण सहसंचालक तंत्रशिक्षण सहसंचालकांनी मान्य केले. मात्र, पार्किंग शुल्क उकळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई कोण करणार, याबद्दल ते काहीच बोलायला तयार नाहीत. एवढेच नव्हे, विद्यापीठ स्तरावर संलग्न महाविद्यालयांसाठी पार्किंगबाबतचे नियम केले जाऊ शकतात, असे सांगून त्यांनी चेंडू विद्यापीठाच्या कोर्टात टोलवला. 
 
एकीकडे पार्किंगच्या नावाखाली नफेखोरी चुकीची असल्याचे शिक्षण व्यवस्थेतील हे जबाबदार अधिकारी सांगतात. यावरून मांजर दूध पितेय हे त्यांना कळते, मात्र त्याच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची, याबाबत शिक्षण विभागच द्विधा मन:स्थितीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 
 
मान्यता देताना सुविधा पाहतात 
महाविद्यालयातील पार्किंगसाठी पैसे घ्यावेत की नाही, याबाबत नियम नाहीत. परंतु शाळा-कॉलेजांना मान्यता देताना त्यांच्याकडे सुविधा असावी याची पाहणी केली जाते. 
- वैजनाथ खांडके शिक्षण उपसंचालक
 
नफेखोरीचा हेतू अजिबात नसावा 
नाममात्र पार्किंग शुल्क घेऊ शकतात. परंतु विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची सुविधा ठेवायलाच हवी. वाहन सुरक्षेच्या नावाखाली जर नफेखोरीचा उद्देश असेल तर ते चुकीचे आहे. 
- डॉ.महेश शिवणकर उच्च तंत्रशिक्षण सहसंचालक
 
जागा लीजवर तर वसुली चुकीचीच 
विद्यापीठ आपल्या स्तरावर संलग्न महाविद्यालयांसाठी नियम करू शकते. एखाद्या संस्थेला लीजवर जागा मिळाली असेल आणि ते पैसे घेत असतील तर ते चुकीचे आहे. 
- डॉ. राजेंद्र धामणस्कर उच्च शिक्षण सहसंचालक 
 
हेही वाचा, 
बातम्या आणखी आहेत...