आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारण हे राजकारण: वाहतूक पोलिसांच्या कारवाईवरून रंगली जुगलबंदी, खराब रस्त्यांचे गायले रडगाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅड. संजय शिरसाट - Divya Marathi
अॅड. संजय शिरसाट
औरंगाबाद - वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर केली जाणारी कारवाई हा सध्या शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय. त्याचेच प्रतिबिंब गुरुवारी पोलिसांकडून शहरात बसवण्यात येणाऱ्या १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उद्घाटन समारंभात उमटले.
 
वाहतूक पोलिसांनी दुचाकीचालक विद्यार्थ्यांवर कारवाई करावी की नाही? रस्त्यांची अवस्था बिकट असताना अशी कारवाई कितपत योग्य? यावरून या कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय शिरसाट, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, महापौर भगवान घडमोडे यांच्यात कलगीतुरा रंगला. शेवटी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना हेडमास्तरकी करत सबुरीचा सल्ला द्यावा लागला. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी हजर होते. 
 
किमान विद्यार्थ्यांना तरी दंडाची पावती देऊ नका 
वाहतूक पोलिस विद्यार्थ्यांना झडप मारून पकडतात. त्यांच्याकडून दंड वसूल करतात. बिचारे मध्यमवर्गीय तरुण खिशात १०० रुपये घेऊन बाहेर पडतात. त्यांना ३०० रुपयांची पावती दिली जाते. अशा वेळी बिचारे विद्यार्थी काय करतील? किमान विद्यार्थ्यांचा तरी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पोलिसांना टार्गेट देता. कार्यकर्ते आम्हाला फोन लावून पोलिस कर्मचाऱ्याच्या हातात देतात तेव्हा आम्ही सीपी साहेबांशिवाय कोणाचेही ऐकणार नाही, असे कर्मचारी सांगतात. किमान अडचणीच्या वेळी तरी पोलिसाचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील खड्ड्यांकडेही लक्ष द्या. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>कारवाई करण्याआधी रस्त्यांची अवस्था तर पाहा- आ. इम्तियाज जलील 
>विद्यार्थ्यांना पावत्या अन् गुंडांना माफी, हे कसे?-  भगवान घडमोडे
>हेवेदावे नको, माणुसकी जपा- हरिभाऊ बागडे... 
बातम्या आणखी आहेत...