आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Program On Gopinathrao Industrial Development Of Marathwada, Some Memories'

मुंडे पश्चिम महाराष्ट्राचा दबाव झुगारणारे नेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री असताना जितकी गुंतवणूक मराठवाड्यात आली नाही त्यापेक्षा अधिक उद्योग आणि गुंतवणूक गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे या भागात येऊ शकली. मराठवाड्यात उद्योग आणण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा दबाव झुगारणारे ते नेते होते, असे गौरवोद््गार प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांनी काढले. मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोमवारी "गोपीनाथराव मराठवाड्याच्या औद्योगिक विकास, काही आठवणी' या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
भानुदास चव्हाण हॉलमध्ये दोनदिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी उद्योजक उल्हास गवळी आणि राम भोगले यांनी उद्योगाबाबतीत त्यांच्या आठवणी सांिगतल्या. भोगले म्हणाले, शेंद्रा एमआयडीसीचे मूलभूत काम तसेच मराठवाड्यात उद्योगाच्या माध्यमातून गुंतवणूक आणण्यात मुंडे यांचे मोठे योगदान होते. मुंडे मराठवाड्याच्या उद्योगवाढीसाठी कधीही कुणाच्या दबावाला बळी पडले नाहीत. अनेकदा पश्चिम महाराष्ट्राचा दबाव असतानाही त्यांनी विकासाचे ध्येय ठेवले. मराठवाड्यात उद्योग यावेत, हे म्हणणे मांडताना त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. युरोपमध्ये उद्योगाचे शिष्टमंडळ जाताना मराठवाड्यात उद्योग यावेत यासाठी उद्योजकांचे प्रतिनिधित्व असावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

उद्योजकांना स्वखर्चाने सरकारी शिष्टमंडळासोबत येण्याची परवानगी त्यांनी दिली. त्यानंतर स्कोडाच्या व्यवस्थापनासोबत सरकारी अधिकाऱ्यांचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर मराठवाड्यातील उद्योजकांना सादरीकरण करण्याची संधी त्यांनी दिली. ग्रामीण भागात जकात रद्द करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. जो याअगोदरच्या कोणत्याही सरकारला घेता आला नाही. मराठवाड्याच्या उद्योजकांचे प्रश्न आणि कामगारांच्या समस्या यामध्ये त्यांनी नेहमी समतोल राखत प्रश्न सोडवल्याचे मत त्यांनी मांडले.
सामाजिक विकासाबरोबर आर्थिक विकास
मुंडेयांच्या आठवणी सांगताना उल्हास गवळी म्हणाले, सामाजिक विकासाबरोबर आर्थिक विकास किती गरजेचा आहे, याबाबत मुंडे यांचा कायम आग्रह असायचा. मराठवाड्याच्या उद्योजकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा आयएएस अधिकाऱ्यांना रात्री फोन करून हा प्रश्न सुटला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मराठवाड्यात उद्योगवाढीसाठी चांगले अधिकारी असावेत हा आग्रहदेखील त्यांचा असायचा. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नांची त्यांना खऱ्या अर्थाने जाण असल्याचे मत गवळी यांनी व्यक्त केले. या वेळी आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, प्रवीण घुगे, भागवत कराड, गजानन बारवाल, नंदकिशोर चरखा, प्रवीण बर्दापूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नागरे यांनी केले. शिरीष बोराळकर यांनी आभार मानले.