आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोड रुंदीकरणात पन्नास मालमत्तांवर टाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रस्त्याच्या रुंदीकरण कामाला पितृपक्षात सुरुवात (पितृपक्ष सोमवारपासूनच सुरू) करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने रुंदीकरणाचे अर्थात पाडापाडीचे काम हाती घेण्यात आले नव्हते. जालना रस्ता पूर्वी ३० मीटरचा होता. नंतर विकास आराखड्यात तो ४५ मीटरचा करण्यात आला. गेल्या १५ वर्षांपासून बांधकाम परवानगी देताना ४५ मीटरचा रस्ता गृहीत धरण्यात येतो. या रस्त्यावरील शासकीय इमारतींनी पूर्वीच १५ मीटरवरील बांधकामे काढून घेतली आहेत. तरीही याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. आता हा विषय अजेंड्यावर आला असून पंधरा दिवसांपूर्वीच मार्किंग करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमणे काढण्यात आली. या रस्त्यावर अतिक्रमणे कमी आहेत. भूसंपादनानंतर जागेचा ताबा तेवढा रस्त्यासाठी देण्यात आलेला नाही. अशा ५० च्या आसपास इमारती बाधित होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

असे आहे चित्र
३० मी. रस्ता सध्या उपलब्ध
४५ मीटर (१५० फूट) रुंदी
१० कि.मी. रस्त्याची लांबी
>दोन्हीही बाजूंनी प्रत्येकी १५ मीटर रुंदीकरण
>अनेक वर्षांपासून मुद्दा चर्चेत असल्याने अनेकांनी ४५ मीटरच्या आतील बांधकामे काढून घेतली.
>तरीही५० मालमत्तांचा काही भाग यात बाधित होऊ शकतो.