आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमितेशकुमार, बकोरियांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, शिवसेनेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिका आयुक्त पत्र देतात अन् पोलिस आयुक्त लगेच मालमत्ता कर वसुलीच्या कामाला लागतात. हा काय प्रकार आहे? शहरात खून होताहेत, दरोडे पडताहेत, अवैध धंदे सुरू आहेत, हे सर्व सोडून पोलिस नागरिकांसोबत अशी दादागिरी कशी काय करू शकतात. पोलिसांची ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. पोलिस आयुक्त अमितेशकुमार पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या विरोधात वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला.
शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३१ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय बकोरिया यांनी घेतला. पोलिस मालमत्ताधारकांना बोलावून त्रास देणार असल्याचे समजल्यानंतर खैरे संतप्त झाले. त्यांनी सकाळी पोलिस आयुक्तांशीही चर्चा केली. महापौरांनी फोन केल्यानंतरही बकोरिया चर्चेसाठी उपलब्ध झाले नाहीत. बकोरियांनी विनंती केल्याने आपण पोलिस मदत देत असल्याचे त्यांना अमितेशकुमार यांनी सांगितल्याचे खैरे म्हणाले. यावर बोलताना खैरे म्हणाले की, अधिकाऱ्यांची ही कोणती मस्ती आहे. केवळ अधिकारी पदावर आहात म्हणून तुम्ही सामान्य नागरिकांना त्रास देणार आहात काय? मालमत्ता कराची वसुली करणे हे पालिका आयुक्तांचे काम आहे, ते आपले काम करू शकले नाहीत. म्हणून मालमत्ताधारकांना पोलिसांसमोर उभे करणार काय? असा सवाल करतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही असे होऊ देणार नाही. नागरिकांना संरक्षण देणे हे आमचे काम आहे, आम्ही मोठ-मोठ्या गुंडांना गाडले आहे, नागरिकांना त्रास देणाऱ्यांनाही आम्ही बघून घेऊ, मंदिरे आम्ही पाडू दिली नाही तसेच मालमत्ता कराची वसुलीही पोलिसांना करू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच कर वसुलीसाठी पोलिस बळाची मागणी करणारे बकोरिया कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे खैरे यांनी बकोरिया यांचा उल्लेख वारंवार ‘कोण तो बुकोरिया’ असाच केला.

कांगाची टांगचा किस्सा : यावेळी खैरे यांनी मुंबईचे माजी आयुक्त कांगा यांचे उदाहरण दिले. महापौर शिवसेनेचा असतानाही कांगा यांनी शिवसेनाप्रमुखांचा आदेश मानण्यास नकार दिला होता. तेव्हा बाळासाहेबांनी ‘कांगाची टांग कोठे आहे ते बघा’ असे शिवसैनिकांना सांगितले अन् शिवसैनिकांनी पुढे कांगांची टांग बघितली. त्यांना गचंडी धरून बैठकीत आणले होते, असा किस्सा सांगितला. अर्थात येथे पुढे काय, यावर ते बोलले नाही.

सीपींविषयी काय म्हणाले ?
शहरातखून होताहेत, दरोडे पडताहेत ते सोडून तुम्ही मालमत्ता कर कसे वसूल करता. ते तुमचे काम आहे का? तुम्ही तुमचे काम नीट करा, इतर कामात ढवळाढवळ करू नका. तुम्हाला तुमचे काम नाही का? शहरात किती अवैध धंदे सुरू आहेत, त्याकडे लक्ष द्या. कोणामुळे अवैध धंदे चालतात त्याकडेही जरा बघा.
खैरे यांचे आरोप असे
{भांडण लावून नेत्यांना दूर करण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होतोय.
{शिवसेनेला बदनाम करून मते कमी करण्याचा हा प्रयत्न आहे
{सेना नेते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याचे तेच सांगतात.
{शिवसेनेला बदनाम करण्याचे काम ते मुद्दाम करताहेत.
बातम्या आणखी आहेत...