आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यांत १४ टक्के मालमत्ता करवसुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिजोरीत खडखडाट असताना मनपाला सात महिन्यांत केवळ १४ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. त्यापैकी केवळ ४० कोटी ८३ लक्ष रुपये मालमत्ता करांची वसुली झाली आहे. दरमहा केवळ दोन टक्के या प्रमाणात ही वसुली होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट २७० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. त्यात स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आलेल्या मनपाला ८० टक्के मालमत्ता करवसुली करण्याची अट टाकण्यात आली आहे. सात महिन्यांत झालेली वसुली बघता ही वसुली फक्त १४ टक्के झाली आहे. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर शहरात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा २५० कोटी रुपयांचा हिस्सा राज्य शासन जमा करेल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मनपाला दरवर्षी भरावा लागणारा ५० लाख रुपयांचा भार हलका झाला आहे. मनपाने नऊ झोन केले असले तरी आतापर्यंत जुन्या रचनेप्रमाणेच मालमत्ता कर वसुलीची नोंदणी करण्यात येते. त्यानुसार सहा प्रभागांतून वसुली करण्यात आली. तसेच मुख्यालयात एलबीटी, बांधकाम परवानगी भोगवटा प्रमाणपत्रापोटी नगर रचना विभागातील वसुली तसेच शासन निधी असा मिळून ६८ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी जमा असून आतापर्यंत एकूण १०९.५८ कोटी रुपयांचा महसूल मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...