आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किऑस्कद्वारे भरा आता मालमत्ता कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एटीएमसारख्या यंत्राच्या माध्यमातून रोख रक्कम, चेक, डीडी अथवा ऑनलाइनच्या माध्यमातून करभरणा करण्याची सुविधा मनपा देत आहे. उद्यापासून सिडकोत ही सुविधा सुरू होणार असून लवकरच शहरात इतर ठिकाणीही मनपाचे हे किऑस्क उभे राहणार आहेत.
नगरविकास सचिव श्रीकांत सिंह यांच्या उपस्थितीत उद्या सिडकोतील एचडीएफसीच्या एटीएमसेंटरमध्ये मनपाचे हे करभरणा किऑस्क सुरू होणार आहे. आज यासंदर्भात माहिती देताना आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, या यंत्राच्या माध्यमातून मनपाने शहरातील नागरिकांना 24 तास करभरणा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. एटीएम यंत्रासारख्या या यंत्राच्या मदतीने नागरिकांना आपला कर भरता येईल. रोख रक्कम, चेक अथवा डीडी या माध्यमातून कर भरता येणार आहे. चेक भरल्यास त्याची स्कॅन कॉपी दिली जाणार आहे. या ठिकाणी केलेल्या करभरणाची नोंद थेट मनपाच्या करवसुली विभागाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व्हरला होणार आहे. याशिवाय इंटरनेटची सुविधा दिल्याने याच किऑस्कमधून ऑनलाइनदेखील कर भरता येणार आहे. म्हणजेच करदात्यांना थेट आपल्या बँक खात्यातून कराची रक्कम मनपाच्या खात्यात भरता येईल.