आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करात २५ % वाढीचा प्रस्ताव; करदात्यांवरच बोजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवीन आर्थिक वर्षाचे वेध लागताच महापालिकेने मालमत्ता करात सरासरी २५ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. नवीन मालमत्ता शोधून त्यांना कराच्या जाळ्यात ओढण्यात अपयशी ठरलेली मनपा कर भरणाऱ्या नागरिकांवर आणखी बोजा टाकणार असल्याची भावना तयार होत आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीकडे आतापर्यंत प्रशासन फारशा गांभीर्याने पाहात नाही असेच चित्र आहे. परिणामी शहरात दिवसागणिक मालमत्तांची संख्या वाढत असताना कराच्या जाळ्यात मात्र मालमत्ता वाढलेल्या नाहीत. परिणामी जे मालमत्ताधारक नियमित कर भरतात त्यांच्यावरच या करवाढीचा बोजा पडत आहे. विशेष म्हणजे एकूण उद्दीष्टाच्या ४० टक्क्यांच्याच आसपास मालमत्ता करवसुली राहाते. परिणामी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांच्या पैशातून कर भरणाऱ्यांच्या विकासकामांसाठी पैसा वापरला जातो असे चित्र उभे राहात आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम ९९ नुसार आगामी आर्थिक वर्षासाठी करांचे दर मर्यादा निश्चित करणे आवश्यक असते. त्यानुसार औरंगाबाद मनपाने नवीन दरांबाबत प्रस्ताव सादर केला असून मंगळवारी (१६ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावानुसार सामान्य करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नसली तरी खरेदी विक्रीच्या आधारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरित केलेल्या मालमत्तांसाठी नामांतर शुल्कात दुपटीने वाढ सुचवण्यात आली आहे. कर योग्य मूल्य ते १० हजार रुपये असणाऱ्या मालमत्तांसाठी आता १५०० रुपये आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याच श्रेणीतील व्यावसायिक मालमत्तांसाठी हे शुल्क तीन हजार रुपये करण्याचे सूचवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात रिसेलच्या मालमत्ता घेणाऱ्यांना जादा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मालमत्ता कराचे दर ठरवताना रेडीरेकनरनुसार चार विभागांच्या दरात सरासरी १७४.६९ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करीत प्रस्तावात म्हटले आहे की गतवर्षीच्या म्हणजेच सध्या प्रचलित असलेल्या मालमत्ता कराच्या दरात २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सरासरी २५ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

कर आकारणी गट
निवासी, निवासेतर, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, भारत सरकारच्या मिळकती, मोबाइल टाॅवर्स, औद्योगिक

प्रस्तावित दर
१३.७५रु. १२.५ रु. ११.२५रु. १० रु.
१२.५ रु. ११.२५ रु. १० रु. ७.५ रु.
११.२५ रु. १० रु. ८.७५ रु. ६.२५ रु.
१० रु. ३.७५ रु. २.५ रु. १.२५ रु.

रेडीरेकनरनुसार ठरवलेले मिळकतीचे दर / चौ. मीटर
अ] ४५ हजार रु. पेक्षा जास्त असलेल्या सर्व मिळकती
ब] ३४९०० ते ४४९९९ रुपये
क] ३१७९९ ते ३४८९९ रुपये
ड] २५००० ते ३१८०० रु. आणि त्यापेक्षा कमी किमतीस असलेल्या सर्व मिळकती

प्रचलित दर प्रकार
आरसीसी ११ रु. १० रु. ९रु. रु.
गोलपटाव लाकडी छत १० रु. रु. रु. रु.
पत्रे, मंगलोर टाइल्स रु. रु. रु. रु.
सिमेंट पत्रे, बांबू तट्टर रु. रु. रु. रु.