आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: 585 जणांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांविरुद्ध कारवाईची मोहीम ग्रामीण पोलिसांनी सुरू केली. दरम्यान वारंवार गुन्हे करून परिसरात अशांतता पसरवणाऱ्या सात जणांना दोन वर्षांसाठी तडीपार, तसेच तब्बल ५८५ जणांविरुद्ध तात्पुरत्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून एसडीएमकडे (उपविभागीय दंडाधिकारी) पाठवला आहे. तसेच एका वाळू तस्कराविरुद्धही एमपीडीएचा प्रस्ताव तयार झाला असून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरातीसाठी पाठवण्यात येणार आहे. 

निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसांपासून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान याच काळात ज्यांच्यामुळे निवडणूकीदरम्यान गोंधळ होण्याची शक्यता आहे, अशा जवळपास ५८५ जणांविरुद्ध तात्पुरत्या स्वरुपातील तडीपारीचे प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी तयार केले असून हे संपूर्ण प्रस्ताव संबधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपातील तडीपारी ही पाच ते सहा दिवसांची राहणार असून तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करणाऱ्यांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच २१ फेब्रुवारीला सकाळी वाजता त्यांच्या त्यांच्या गावात प्रवेश करता येणार आहे. 
 
सध्या या तडीपारी प्रस्तावांच्या प्रकरणांवर अंतिम प्रक्रिया सुरू असून लवकरच एसडीएमकडे पाठवण्यात येणार आहे. यादरम्यान पोलिसांनी कलम १०७ प्रमाणे हजार २५५, कलम ११० प्रमाणे १२०, कलम १५१ प्रमाणे २१४, कलम १४९ प्रमाणे हजार १४४ आणि कलम ९३ प्रमाणे २०९ प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. 

प्रस्तावांची छाननी सुरू : जिल्ह्यातील३१ ठाण्यातून आलेले तात्पुरत्या दोन वर्षांसाठी तडीपारी प्रस्तावाची ‘स्क्रुटीनी’ सुरू आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रस्ताव संबधित एसडीएमकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मागील २५ दिवसात अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध कारवाई केल्याचे एलसीबीचे पीआय अनिल लाड यांनी सांिगतले. 

सर्वाधिक १११ प्रस्ताव अंजनगाव सुर्जीचे 
पोलिस ठाणे प्रस्ताव 
अंजनगाव सुर्जी १११ 
चांदूर बाजार १०८ 
परतवाडा ५६ 
कुऱ्हा ४३ 
माहुली ३३ 
शिरजगाव ६२ 
 
बातम्या आणखी आहेत...