आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी 17 कोटी रुपयांचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण येथील उद्यानासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. एमटीडीसी, वन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या उद्यानासाठी जलसंपदा विभागाने १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान समस्यांच्या गर्तेत असून काही कारंजे बंद पडले आहेत. 

जलसंपदा विभागाच्या वतीने हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एमटीडीसीनेही प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव २८ कोटी रुपयांचा होता. मात्र, त्यापूर्वीच जलसंपदा विभागाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आगामी अधिवेशनात हा निधी मिळण्याची शक्यता आहे.

सुविधांअभावी पर्यटकांंनी उद्यानाकडे पाठ फिरवल्याने हे उद्यान विकसित करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. उद्यानासाठी दोन कोटींचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवण्यात आला असून याबाबत भापकर यांनी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्याशी चर्चा केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...