आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अहिरेंच्या पुनर्नियुक्तीसाठी विद्यापीठात तृतीयपंथीयांचा राडा, कुलगुरूंनी पोलिस बोल‌वले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ताराबाईशिंदे स्री अभ्यास केंद्राच्या संचालकपदवर डॉ. प्रतीभा अहिरे यांना पुनर्निनुक्तीच्या मागणीसाठी बुधवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडेंना दालनात गाठून तृतीयपंथीयांनी ‘साडी चोळी’चा आहेर देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने पोलिसांना पाचारण केल्यामुळे तृतीयपंथीय पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
 
अहिरे यांना सेवा सातत्य दिल्यानंतरही कार्यमूक्त केल्यामुळे बुधवारी तृतीयपंथीयांनी विद्यापीठात राडा केला, गंगापूर येथील साईसीमा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा तृतीयपथीय सीमागुरू खुर्शिद नायक यांच्या नेतृत्वात सकाळी कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आले होते. कुलगुरू मात्र महात्मा फुले सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमात होते. त्यामुळे त्यांनी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना भेटण्याची सूचना केली. अन्यथा आपण कार्यक्रम संपल्यानंतरच भेटू अशीही भूमिका घेतली.

त्यामुळे शिष्टमंडळाने कार्यक्रम संपेपर्यंत प्रतीक्षा करण्यालाच पसंती दिली. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र कुलगुरूंनी शिष्टमंडळाला भेटण्याऐवजी विद्यापीठातून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे सहा तृतीयपंथीय संतापले. त्यांनी “कुलगुरू हाय..हाय” च्या घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर कुलगुरूंनी डॉ. सुहास मोराळे यांना पोलिसांना पाचारण करण्यास सांगितले. आठ ते दहा पोलिसांनी शिष्टमंडळाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कुलगुरूंना निवेदन दिल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत, येथेच ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी केली.

कुलगुरू पुन्हा दालनात आल्यानंतर सीमागुरू खुर्शिद नायक, सोनीगुरू सीमा नायक, हिनागुरू सीमानायक, धन्नूगुरू सीमानायक, सौंदर्यागुरू शिल्पा, इच्छागुरू धन्नू आदींसह प्राचार्य सुनील वाकेकर, नागरी मुलभूत हक्क अभियानचे आदेश अटोटे यांनी भेट घेतली. कुलगुरूंनी मात्र आपला निर्णय आता बदलणार नाही, त्यांना कोर्टाची दरवाजे खुले असल्याचे निक्षून सांगितले.
 

आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलो होतो. तृतीयपंथिय आले की, लगेच पोलिस बोलवायचे म्हणजे काय..? आम्ही काय अतिरेकी आहोत की, काय..? पोलिसांना दुसरे काही काम आहे की नाही..? कुलगुरूंनी मात्र पोलिसांच्या आडून आम्हाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
- सीमागुरू खुर्शिद नायक, तृतीयपंथिय
 
बातम्या आणखी आहेत...