आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Proud A School Which Give Solider To Nation Makarand Anaspure

सैनिक घडवणा-या शाळेचा अभिमान - मकरंद अनासपुरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - देशात घुसखोरी, दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले असून यासाठी अशा शाळांमधूनच देशाचे रक्षण करणारे अधिकारी निर्माण होत आहेत. ही अभिमानाची बाब असल्याचे मत मराठी चित्रपटातील विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. ते गंगापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावरील शहापूर बंजर येथील डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात शनिवारी बोलत होते.

माझे सैनिकी थाटात स्वागत झाले. मला यातील काय ढेकळं कळतं? सांगितल्यावर कळालं की हे स्वागत होतं. एका विनोदी अभिनेत्याचे शिस्तीत स्वागत केले ही अभिमानास्पद बाब असून या स्वागतामुळे मी भारावून गेलो आहे. ग्रामीण भागात केवळ पाच वर्षांत शाळेने जी भरारी घेतली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. येत्या पाच वर्षांत याचा वटवृक्ष होईल यात शंका नाही, असे मतही अनासपुरे यांनी व्यक्त केले. या वेळी मानव विकास कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमीनाथ रहाणे, ले. कर्नल आर. एस. ठाकूर, माजी उपसभापती सर्जेराव चव्हाण, सचिव सचिन रहाणे, संचालक उत्तमराव कांबळे, कारखान्याचे उपाध्यक्ष शेषरावनाना जाधव तसेच डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक केदार रहाणे, प्राचार्य रामेश्वर रहाणे, मुख्याध्यापक के. बी. वाकळे आदींची
उपस्थिती होती. सूत्रसंचालन मयूरी देसाई, हेमांगी निकम व गुंजकर यांनी केले.