आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलचालकाला पोलिस उपनिरीक्षकाची मारहाण, उपनिरीक्षकाविरोधात गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मंगळवारी रात्री गस्तीवर असलेल्या पुंडलिकनगर ठाण्याचे उपनिरीक्षक पथकाने हॉटेल बंद करून बाहेर उभ्या असलेल्या हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे पगार करून हॉटेलचालक त्यांच्याशी बोलत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी हॉटेलचालक सुहास अरुण बागल (२६, रा. कांचनवाडी) यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक सचिन मिरधे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. गजानन मंदिर भागात पुंडलिकनगर रस्त्यावर बागल यांचे हॉटेल माउली रेस्टॉरंट आहे. बागल हे मंगळवारी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास हॉटेल बंद करून कर्मचाऱ्यांचा पगार करत होते.

या वेळी मिरधे त्यांचे सहकारी गस्तीवर होते. बागल हे कर्मचाऱ्यांसह उभे दिसल्याने पोलिसांनी गाडी थांबवून रस्त्यावर का थांबलात, अशी विचारणा करत थेट बागल यांच्या दोन्ही पायांवर लाठीने मारहाण करून शिवीगाळ केली, असे बागल यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे बागल हे शिवसेना पदाधिकारी आहेत. बुधवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. चौकशी करून योग्य गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
एकेरी भाषा वापरून अरेरावी : रात्रीएक वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी हॉटेलचालकाकडे विचारणा केली असता त्याने उपनिरीक्षक मिरधे त्यांच्या सहकाऱ्यांना एकेरी भाषा बोलून अरेरावी केली. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल,असे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...