आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपनिरीक्षक परीक्षेसाठी ‘बेअर अँक्ट’ची पुस्तके वापरावीत; रितेशकुमारांच्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस खात्यात शिपाई ते सहायक फौजदार पदावर कार्यरत असलेल्या आणि खात्यात दहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांची उपनिरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा होत आहे. यासाठी ‘बेअर अँक्ट’ची (कलमांची व्याख्या) पुस्तके वापरावीत, अशी सूचना मंगळवारी सायंकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी केली आहे.

मराठवाड्यातून 2100 जागांसाठी 25 हजार उमेदवार खात्याअंतर्गत परीक्षेची तयारी करत आहे. चौधरी लॉ पब्लिशर्सची पुस्तके चालणार की नाही, याबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आज सायंकाळी रितेशकुमार यांनी बेअर अँक्टची पुस्तके चालतील, असे स्पष्ट केले. तसेच मूळ पुस्तके उपलब्ध नसल्यास त्यांच्या झेरॉक्स प्रतीही चालतील; परंतु स्पष्टीकरण अथवा टिप्पणी असलेली पुस्तके चालणार नाहीत, अशी माहिती दिली. परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा केंद्रप्रमुखांकडे पाठवण्यात येतील. परीक्षा केंद्रप्रमुख आवश्यकतेप्रमाणे प्रती तयार करणार आहेत. लेखी परीक्षा दोन भागांत घेतली जाणार आहे. त्यापैकी ‘अ’ भाग हा 70 (वस्तुनिष्ठ स्वरूपाचा) गुणांचा राहील. त्यामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 35 प्रश्न असणार आहेत, तर ‘ब’ भाग हा 30 गुणांचा दीघरेत्तरी स्वरूपाचा राहील. फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर केला जाईल. वस्तुनिष्ठ स्वरूपाची उत्तरपत्रिका संगणकाद्वारे तपासून निकाल जाहीर केला जाईल. निकाल वेबसाइटवर जाहीर होणार आहे.