आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फौजदाराने 28 वर्षांत एकदाही घेतली नाही सुटी, अखंड सुरू आहे चळवळ व्यसनमुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकही दिवस सुटी न घेता सलग 28 वर्षे पोलिस खात्यात नोकरी करणा-या इलियास खान पठाण यांनी व्यसनमुक्तीचा अनोखा वसा घेतला आहे. हवालदार ते उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचताना त्यांनी अनेक सहकारी आणि शेकडो तरुणांचे दारू, सिगारेट, तंबाखूचे व्यसन सोडवून त्यांना निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्र दिला आहे.
पठाण हे वाहतूक शाखेत काम करतात. त्यांचे वडीलही पोलिस खात्यात हवालदार होते. 1986 मध्ये शहर मुख्यालयात त्यांनी नोकरी मिळवली. तत्कालीन पोलिस अधीक्षक तुकाराम वानखेडे यांनी पारदर्शक भरती करताना त्या वेळी तरुणांना तंबाखू खाता का? दारू पिता का? असे प्रश्न विचारून व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वत:ही व्यसनाच्या आहारी न जाता इतरांनाही त्यापासून दूर राहण्याचे ते सांगत आहेत.