आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिव्ह इन’पार्टनर महिलेवर पीएसआयने झाडली गोळी, थोडक्यात बचावली साॅफ्टवेअर इंजिनिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या नऊ महिन्यांपासून पती, मुलांना सोडून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या अभियंता महिलेवर हर्सूल कारागृहाचा पोलिस उपनिरीक्षक किरण संतोष पवार (४०, रा. धुळे) याने गोळी झाडली. मुली आणि परिवाराने समुपदेशन केल्यानंतर त्या महिलेने घरी जाण्याचा हट्ट करताच संतापलेल्या पवारने हे पाऊल उचलले. सुदैवाने नेम चुकल्याने तिचे प्राण वाचले. महिलेच्या फिर्यादीवरून पवारवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी पवारने गोळीबार झाला. या प्रकारानंतर घाबरलेली महिला पतीकडे गेेली. तेव्हा पवारने विवाहितेच्या घरात शिरून पुन्हा तोडफोड केली. अखेर पतीने धीर दिल्यानंतर तिने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दिली. सिडको पोलिसांनी पवारला ताब्यात घेऊन सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पवारने झाडलेली गोळी पोलिसांनी जप्त केली आहे. ३९ वर्षीय विवाहिता वाळूज येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहे. तिची मुलगीदेखील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, मुलगा शिक्षण घेत आहे. २००८ मध्ये हर्सूल कारागृहात असलेल्या एका आरोपीला भेटण्यासाठी विवाहिता गेली होती. त्या वेळी तिची उपनिरीक्षक किरण पवारसोबत ओळख झाली. २०१२ ती मध्ये पुण्याला राहायला गेली. पवारदेखील तिच्या संर्पकात होता. अधून-मधून तो पुण्यात भेटायचा. त्याने घरगुती समस्या सांगत तिला आपल्या जाळ्यात ओढले. विवाहिता पतीला काही एक सांगता जानेवारी २०१७ मध्ये हडको, एन-११ भागात त्याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला आली. काही दिवसांपूर्वी विवाहितेने पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचे पवारला सांगितले. तेव्हा मात्र तो नकार देऊ लागला. 
 
मुलीसमोर झाडली गोळी 
विवाहितेचीमुलगी दिवाळीनिमित्त तिला भेटण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी आली. दहाच्या सुमारास मुलगी आणि विवाहिता पवारसोबत चर्चा करण्यासाठी घरात बसले. मुलीचा विवाह करायचा असल्याने आता पतीसोबत राहायचे असल्याचे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून त्याने विवाहितेला बेदम मारहाण केली. तसेच तिच्यावर खासगी रिव्हॉल्व्हर रोखून गोळी झाडली. पण प्रसंगावधान ओळखून खाली वाकल्याने ती बचावली. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देत पवार निघून गेला. 
 
पतीच्या घरी येऊन तोडफोड 
पवारनेधमकी दिल्याने विवाहिता सिडको, एन-६ मध्ये राहणाऱ्या पतीच्या घरी गेली. मात्र, सोमवारी रात्री पवारने तिच्या पतीचे घर गाठले. तेथे गोंधळ घालत घराच्या काचा फोडल्या. त्यानंतर विवाहितेसह तिचा पती सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाला. दोघांनी घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांना सांगितला. प्रजापती यांनी तक्रार नोंदवून घेत पवारला सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. ज्या वेळी पवारला या महिलेसमोर आणले तेव्हा ती अक्षरश: थरथर कापत होती. तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर करत आहेत. 
 
ज्या तुरुंगात अधिकारी, त्याच तुरुंगात कोठडी 
ज्याहर्सूल तुरुंगात अधिकारी म्हणून पवार काम करत होता, त्याच हर्सूल तुरुंगात त्याला कैदी म्हणून राहण्याची वेळ आली. लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच पवारने पत्नीला सोडून दिले. हडकोतील ज्या घरात हे दोघे राहत होते, तेथील शेजाऱ्यांना आम्ही भाऊ-बहीण असल्याचे सांगत होता. 
 
बातम्या आणखी आहेत...