आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्येचा विचार मनात आला तर एकदा आम्हाला फोन करा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनात आत्महत्येचा विचार आला तरी त्यांनी पालक किंवा शिक्षकांना सांगावे. निदान आम्हाला फोन करा. असा विचार पुन्हा तुमच्या मनात येणारच नाही याची आम्ही हमी देतो, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ आणि काही तंत्रज्ञ प्राध्यापकांनी सर्व शहरवासीयांना केले आहे. विशेष म्हणजे या तज्ज्ञांच्या मते समजूतदारपणाचे वय पूर्वीपेक्षा दुपटीने घटले आहे. पूर्वी मुलांना १४ ते १६ व्या वर्षी समज येत होती ती आता आठव्याच वर्षीच येत आहे.
चार दिवसांपूर्वी कल्याणी जाधव या अकरावीत शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने शहरवासीय हळहळले. अनेकांनी फोन करून अशा मुला-मुलींचे प्राण वाचवा, अशी विनंती केली. आम्ही अनेकांचे प्राण वाचवले आहेत. असा विचार आला तर एकदा आमच्याशी बोला, असे आवाहन प्राचार्य दिलीप गौर मानसोपचार तज्ज्ञ डॉ.संदीप अपर्णा शिसोदे यांनी केले आहे.

का येतात आत्महत्येचे विचार? : प्राचार्यगौर हे आयसीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी इंटरनेटवर यू-ट्यूबच्या माध्यमातून समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. त्यांच्या क्लिप पाहिल्यावर ताण हलका होतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते मुलांमध्ये स्पर्धेमुळे प्रचंड ताण वाढत आहे. जे विद्यार्थी ताण सहन करू शकत नाहीत त्यांच्या मेंदूतला कार्टिझॉल, सेरॉटेनीन नावाचे स्ट्रेस हार्माेन्स कमी होतात. हे हार्मोन्स मेंदूचा मूड बॅलेन्स करतात. योग्यवेळी मुलांना समुपदेशन झाले तर या हार्माेन्सचा प्रभाव कमी होऊन आत्महत्या टळतील.
मुलांशी मनमोकळे बोला
: मुलांवरस्पर्धेमुळे ताण वाढला आहे. तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे त्यांना माहिती नसते. पालकही अनभिज्ञ असतात. त्यामुळे मुलांच्या मनात नेमके काय सुरू होते हे घटना घडून गेल्यावर कळते. मुलांशी मनमोकळा संवाद साधला तर पालक, शिक्षक किंवा समुपदेशक अप्रिय घटना टाळू शकतात, असे मत डॉ. संदीप शिसोदे यांनी मांडले.

मनोरुग्णठरवलेला एडिसन बनला महान शास्त्रज्ञ
महानशास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना शाळेत शिक्षकांनी चिठ्ठी देऊन शाळेतून काढून टाकले. आईने चिठ्ठी वाचली. ती एका ड्राॅवरमध्ये कुलूप बंद केली अन् लहानग्या थॉमसला तिने शिकवले. म्हातारपणी ड्राॅवर आवरताना त्यांनी ही चिठ्ठी वाचून ते ओक्साबोक्शी रडले. चिठ्ठीत लिहिले होते की, तुमचा मुलगा मनोरुग्ण आहे. त्याला आम्ही शिकवू शकत नाही. तो पुढे काही करेल असे वाटत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकत आहे, पण अाईने हार मानता एक महान शास्त्रज्ञ जगाला दिला, असे गौर यांनी सांगितले.

त्याने गळफास दूर लोटला
डॉ.संदीप शिसोदे यांनी सांगितले की, नापास झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावला होता. आई-वडिलांनी हा प्रसंग खिडकीतून पाहताच त्यांनी शिक्षण मंडळाला फोन केला. मंडळाने मला घटनास्थळी पाठवले. मी त्याला खिडकीतूनच तू पास झाला आहेस, असे सांगताच त्याने गळफास दूर लोटला. समुपदेशनानंतर तो तणावमुक्त झाला. वास्तविक तो नापास झाला होता. वडील रागावतील म्हणून मी जीवन संपविण्यास निघालाे हाेतो, अशी कबुली त्याने दिली. तोच मुलगा आता मोठा अभियंता बनला आहे.
प्राचार्य दिलीप गौर
डॉ. संदीप शिसोदे
ही लक्षणे असतील तर सावध व्हा
समाजातमिसळणे, एकांतात राहणे, कमी बोलणे, कमी जेवणे, कमी झोपणे, अस्वच्छ राहणे, डोळ्यांना डोळे भिडवता बोलणे, सतत दु:खी राहणे, निर्णयक्षमता कमी होणे, मोबाइल, इंटरनेटचा अतिवापर, अति टीव्ही पाहणे, आत्महत्येचा विचार एकदा तरी बोलून दाखवला असेल तर पालकांनी सावध व्हावे.

यांच्याशी बोला बिनधास्त : डॉ. संदीप शिसोदे : ९८९००५४५१८,प्राचार्यदिलीप गौर :९८२२२०७७१
बातम्या आणखी आहेत...