आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Speaker Sachin Tayade Speaking Issue At Aurangabad

परीक्षेसाठी मंत्र नाही, तंत्राची आवश्यकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी पाठांतरापेक्षा आकलन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश निश्चित आहे. आलेली संधी लक्षात घेऊन ितचे यशात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परीक्षा सोडवण्यासाठी मंत्र नाही, तंत्राची आवश्यकता असून कष्ट करण्यापेक्षा स्मार्टवर्क करून स्पर्धेला जा, असा सल्ला समुपदेशक व प्राध्यापक सचिन तायडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘दिव्य मराठी’ आणि बँकर्स पॉइंटच्या वतीने सोमवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित केलेल्या बँिकंग क्षेत्रातील ‘संधी आणि वेध’ या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. तायडे म्हणाले, येणारे वर्ष हे बँकिंग क्षेत्राचे असून एक लाखापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे. एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेत बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी आहेत. कुठल्याही अभ्यासक्रमात पदवी घेतलेल्या तरुणांना या क्षेत्रात उत्तम करिअर करता येते हे लक्षात घेऊन बँकर्स पॉइंट आणि "दिव्य मराठी'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी बँकर्स पॉइंटचे संचालक सतीश वसे, एस. अमोल, सचिन तायडे, उद्योजक सुभाष औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इंग्रजी भाषेची अनेकांना अडचण येते. ही अडचण कशा प्रकारे सोडवता येईल, या विषयावर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. इंग्रजी भाषा पाठातंराची नसून तिचा रोजच्या जीवनात वापर करा. व्याकरणाचे सूत्र पाठांतर करण्यापेक्षा त्याचा वापर कशा प्रकारे होतो हे लक्षात घ्या. याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या ओघवत्या शैलीत सचिन तायडे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची भावना िवद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जाहिरात उपव्यवस्थापक बाळासाहेब खवले,पवन गावंडे, सय्यद वसीम, महादेव सानप, नाना अंभोरे, ज्योती काथार यांनी परिश्रम घेतले.
या गोष्टी अात्मसात करा

* १५० मिनिटांत २०० प्रश्न कसे सोडवता येतील याचा विचार करा.
*वेळ लावून पेपर सोडवण्याचा सराव करा.
*अनेक पुस्तकांचा वापर न करता एका पुस्तकाचा अभ्यास करा.
*संकल्पना स्पष्ट करा.
*मुलाखतीचा सराव करा.
* फायनान्स, सामान्यज्ञान, इंग्रजी अशा विषयांना परीक्षेत किती वेळ द्यायचा याचे योग्य नियोजन करा.
*इंग्रजीचा अभ्यास करताना प्रथम मराठी व्याकरण पक्के करा.
* इंग्रजीत नेहमी वापरल्या जाणाऱ्या किमान २५० क्रियापदांचा योग्य अभ्यास करा.
*दररोजच्या व्यवहारात इंग्रजीचा वापर करा.
स्वत:शी स्पर्धा करा: इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धा करा. कुठल्याही गोष्टीला कसे, कुठे, केव्हा, का, कोणी असे प्रश्न विचारत राहा. दिखाव्याच्या दुनियेत न राहता कष्ट करा.