आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Public Works Department,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सार्वजनिक बांधकाम विभागाने मांडले नक्षीकामाचे प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबद- वेडेवाकडे, ओबडधोबड आणि त्यातही अर्धवट काम... निम्मा रस्ता उंच, तर उरलेला रस्ता खोलगट. काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडाही पार ढासळलेल्या... कुणालाही हसू येईल अशा पद्धतीने जालना रोडवर नव्या अडचणी उभ्या केल्या आहेत. मनपाने शहरातील रस्त्यांवर उंचवटे करून ठेवले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या नक्षीकामाचे प्रदर्शन मांडले. हे कमी म्हणून की काय ठेकेदार आणि सा.बां.च्या वादामुळे पुढील कामे बंद पडली आहेत. यामुळे आधीच धोकादायक असलेला हा रस्ता आणखी जीवघेणा बनला आहे.
साधी सायकल चालवावी, असेही रस्ते पर्यटननगरीत नसल्याने मोठी अस्वस्थता शहरात पसरली होती. त्यामुळे युवा वर्गाची संस्था ‘मी औरंगाबादकर’, ‘लोकनीती मंच’ आणि सामान्य नागरिकांनी आपापल्या पद्धतीने आंदोलने केली. त्यानंतर राजकारण पेटले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांकडे बोट दाखवले, तर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी 21 कोटी मंजूर करून आणल्याचा गवगवा केला. इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतर तयार होत असलेला रस्ता मात्र आगीतून फुपाट्यात असाच आहे. पावसाळ्याच्या तोंडावर चित्रविचित्र काम करण्यात आल्याने पुढील चार महिने लोकांना चांगले रस्ते मिळण्याची शक्यता नाही.
कडा निखळल्या
एपीआय कॉर्नर ते सिडको टी पॉइंट रस्त्याच्या डाव्या बाजूला केलेल्या रस्त्याच्या कडा निखळल्या आहेत. उंच केलेले पॅचवर्क उखडल्याने मधोमध धोकादायक खड्डेमय रस्ता तयार झाला आहे. या मार्गावर रोज किरकोळ अपघात होत आहेत.
दात कोरून पोट भरणे
जालना रस्त्यावर खड्डेच खड्डे अशी स्थिती असताना सा.बां.ने पॅचवर्कचे काम हाती घेतले. त्यातही कमी-जास्त रुंदीत पॅचवर्क करून काही भाग तसाच सोडून देण्यात आला. पॅचवर्क करून उंचवटे तयार केल्याने खड्डे आणि टेमकाड या दोन्हीचा आता सामना करावा लागत आहे. नगरनाका ते बाबा पेट्रोल पंप, श्रीरामनगर, विठ्ठलनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, एपीआय कॉर्नर, सोहम मोटर्स समोर, सान्या मोटर्ससमोर, सिडको टी पॉइंट, रामगिरी चौक, उच्च न्यायालयासमो सेव्हन हिल्स, जवाहर कॉलनी, मोंढा नाका, अमरप्रीत, क्रांती चौक या मार्गातील प्रत्येक टप्प्यात जुने खड्डे बुजवताना अर्धवट पॅचवर्क केले आहे. तांत्रिक बाबींचा विचार न केल्याने त्रासात भर पडली आहे.
159 बळी तरीही...
जालना रोडवर गेल्या तीन वर्षांत झालेल्या अपघातात 159 बळी गेले. याला लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. निधी मंजूर करून लोकप्रतिनिधींनी हात वर केले. रस्यांवरील खड्डे दूर करून वाहतुकीचा ताण कमी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण गेल्या तीन महिन्यांत तीन किलोमीटरचे काम करून ठेकेदाराने पाठ दाखवली आहे.
ब्रिजपोर्शन एमएसआरडीसीकडे
विमानतळ ते क्रांती चौक साडेतीन मीटरचे आधी पॅचवर्क केले होते. एकूण रस्त्याचा दोन्ही 14 मीटर लेयरमध्ये काम करत आहोत. यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूतील शेवटच्या साडेतीन मीटरच्या दोन लेयरचे काम करणार आहोत. रोकडिया हनुमान कॉलनी ते सिंधी गेट, वसंतराव नाईक महाविद्यालय ते सान्या मोटर्स या ठिकाणी ब्रिजपोर्शन असल्याने या कामाची दुरुस्ती एमएसआरडीसीकडे हस्तांतरित केली आहे.
-जी.डी.देशपांडे, तांत्रिक सहायक, सा.बां.
सलग लांबीत काम करणार
नगर नाका ते विमानतळ या जालना रस्त्याचे सलग लांबीत डांबरीकरण करणार आहोत. नगर नाका ते बाबा पेट्रोल पंपाचे काम प्रगतिपथावर आहे. क्रांती चौक ते नाईक महाविद्यालय डांबरीकरणापैकी सेव्हन हिल्स ते नाईक कॉलेजपर्यंत रस्त्याच्या डाव्याबाजूने काम पूर्ण करण्यात आले आहे. सानिया मोटर्स ते विमानतळ सलग लांबीत पॅचवर्कचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
डी. पी. चौधरी, शाखा अभियंता, सा.बां.
159 बळी तरीही...
जालना रोडवर गेल्या तीन वर्षांत झालेल्या अपघातात 159 बळी गेले. याला लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. निधी मंजूर करून लोकप्रतिनिधींनी हात वर केले. रस्यांवरील खड्डे दूर करून वाहतुकीचा ताण कमी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण गेल्या तीन महिन्यांत तीन किलोमीटरचे काम करून ठेकेदाराने पाठ दाखवली आहे
ब्रिजपोर्शन एमएसआरडीसीकडे
विमानतळ ते क्रांती चौक साडेतीन मीटरचे आधी पॅचवर्क केले होते. एकूण रस्त्याचा दोन्ही 14 मीटर लेयरमध्ये काम करत आहोत. यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंतील शेवटच्या साडेतीन मीटरच्या दोन लेयरचे काम करणार आहोत. रोकडिया हनुमान कॉलनी ते सिंधी गेट, वसंतराव नाईक महाविद्यालय ते सान्या मोटर्स या ठिकाणी ब्रिजपोर्शन असल्याने या कामाची दुरुस्ती एमएसआरडीसीकडे हस्तांतरित केली आहे. -जी.डी.देशपांडे, तांत्रिक सहायक, सा.बां.
सलग लांबीत काम करणार
नगर नाका ते विमानतळ या जालना रस्त्याचे सलग लांबीत डांबरीकरण करणार आहोत. नगर नाका ते बाबा पेट्रोल पंपाचे काम प्रगतिपथावर आहे. क्रांती चौक ते नाईक महाविद्यालय डांबरीकरणापैकी सेव्हन हिल्स ते नाईक कॉलेजपर्यंत रस्त्याच्या डाव्याबाजूने काम पूर्ण करण्यात आले आहे. सानिया मोटर्स ते विमानतळ सलग लांबीत पॅचवर्कचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
डी. पी. चौधरी, शाखा अभियंता, सा.बां.
...शेवटी मी जालना रोडचे काम बंद केले
आधी या रस्त्याची कामे काढली, तेव्हा वाढलेल्या दरवाढीनुसार आम्हाला कामाचा मोबदला द्यावा यासाठी तीन महिने ठेकेदारांनी संप केला होता. तीन लेयर करण्याऐवजी केवळ दोन लेयरचे काम करायला सांगितले. शेवटी मी जालना रस्त्याचे काम बंद केले.
-खाजा अमीन, मस्कॅट कन्स्ट्रक्शन कं.
निधी नसल्याने काम थांबवले
या आधीची कोट्यवधींचे बिले थकली आहेत. आता या कामाचे पैसेही अजून दिले नाहीत. आम्ही 21 कोटी रुपयांतर्गत निधीतील सर्व रस्त्यांची कामे थांबवली. जेव्हा पैसे देतील, तेव्हाच काम करू. त्यात पावसाळा लागल्याने 4 महिने तरी हे काम होणार नाही.
-अजीम सिद्दिकी -बी.आर.कन्स्ट्रक्शन, विजय अरोरा -अरोरा कन्स्ट्रक्शन, खाजा अमीन -मस्कॅट कन्स्ट्रक्शन, राजेंद्रसिंग डी. अजितसिंग