आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू गजानन कॉलनीतील गल्लीत साचले डबके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- न्यू गजानन कॉलनीतील सुलोचना रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकताना उतार काढल्याने पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे तळे साचत आहे. नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच न्यू गजानननगरातील गल्ल्यांमध्ये पाणी साचते. पेव्हर ब्लॉक टाकताना पाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आलेला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तळे साचत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. या भागात शंभर ते दीडशे घरे असून या घरांसमोर लावण्यात आलेली वाहने पाण्याच्या डबक्यात उभी करावी लागत आहेत. नागरिकांना आणि मुलांना येण्या-जाण्यासाठी घाण पाण्यातूनच जावे लागत आहे. तुंबलेल्या पाण्याला वाट काढून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आठ दिवसांत उपाययोजना करू
- न्यू गजानन कॉलनीतील गल्ली नं. मध्ये साचत असलेल्या डबक्याची पाहणी केली आहे. पावसाचे साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना केली जाईल.
विमल केंद्रे, नगरसेविका
- पेव्हर ब्लॉक बसवून काही उपयोग नाही. पाण्याचा उतार काढण्यात आला नाही. त्यामुळे दारासमोर पाणी तुंबते. लहान मुलांना जाता येत नाही.
प्रियंका शिंदे, रहिवासी
- शाळकरी मुलांना, महिलांना जाण्या-येण्यासाठी त्रास होतो. डास, किडे होऊन दुर्गंधी पसरत आहे. मनपाने उपाययोजना केली पाहिजे.
लंका डांगे, रहिवासी
दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.