आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा बांधवांच्या मृत्यूला सरकार कारणीभूत, पूजा माेरे यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरकारने सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मुंबईत मोर्चा काढण्याची वेळच आली नसती अन् कालचा अपघात झाला नसता. मात्र, सरकारने मराठा समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अपघातात जीव गमावणाऱ्या तीन मराठा युवकांच्या मृत्यूस सरकारच जबाबदार अाहे, असा अारोप पूजा मोरे यांनी केला. 
 
मुंबईतील मोर्चाहून परतताना अपघाती मृत्यू झालेल्या हर्षल घोलप, नारायण थोरात, अविनाश गव्हाणे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी कॅनॉट प्लेस येथे श्रद्धांजली वाहण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. 
 
अभिजित देशमुख, राजेंद्र पवार, डॉ. शिवानंद भानुसे, सुनील कोटकर, प्रा. माणिकराव शिंदे, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, रमेश गायकवाड, लक्ष्मण मोटे, भरत कदम, मच्छिंद्र देवकर, मनोज गायके, सतीश वेताळ, सुरेश वाकडे यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. 
 
पाेलिसांमुळे गोंधळ 
श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील दुचाकी उचलण्याची कारवाई सुरू केली. ते पाहताच संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. 
बातम्या आणखी आहेत...