आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pulses Price News In Marathi, Commodity Market, Divya Marathi

डाळी कडाडल्या..100 ते 1300 रुपयांनी भाववाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा बेमोसमी पावसामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील हरभर्‍याचे पीक नष्ट झाल्याने डाळींचे भाव कडाडले. क्विंटलमागे 100 ते 1300 रुपयांनी डाळी महागल्या आहेत. यंदा इंदूरहून मसूर डाळीची आयात करावी लागेल.
यंदा उत्पादन घटल्यामुळे जालना आणि जळगावहून डाळी मागवाव्या लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी 50 ते 80 रुपये किलोने डाळींची आयात होत होती. आता किमतीत वाढ झाली आहे. मसूर आणि हरभराच्या डाळींचे भाव कडाडले आहेत. हरभरा डाळ मध्य प्रदेशातून आयात होते. पावसामुळे तेथील हरभरा खराब झाल्याने जालना येथील लायन आणि इतर जातींचा हरभरा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. किलोमागे पाच ते दहा रुपये जास्त मोजावे लागत आहेत. जळगावहून मूग डाळ, मठ डाळ आणि उडीद डाळ आयात करण्यात येत आहे. तर जालन्याहून हरभरा आणि तूर डाळींची आयात होते.
असे वाढले डाळीचे दर (प्रतिकिलो)
डाळ पूर्वीचे दर आताचे दर
हरभरा 30 ते 35 35 ते 40
तूर डाळ 55 ते 60 60 ते 68
मठ डाळ 45 ते 50 50 ते 60
मूग डाळ 75 ते 80 80 ते 90
उडीद डाळ 40 ते 45 45 ते 52
मसूर डाळ 50 ते 52 50 ते 65
आठवड्यापासून दर वाढले
स्थानिक शेतकर्‍यांकडून डाळी येणे बंद झाले आहे. उन्हाळ्यात डाळींना मागणी जास्त असते. इतर राज्यांतून डाळी आयात कराव्या लागतात. परिणामी डाळींचे दर वाढले. संजय खंडेलवाल, डाळ विक्रेते.