आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे पाय चिरडणारा ‘तो’ वाळूचा ट्रक पोलिस कर्मचाऱ्याचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुंडलिकनगर चौकात बुधवारी सकाळी नेहा संजय जोशी यांचे पाय चिरडणारा तो वाळूचा ट्रक पुंडलिकनगर चौकीतील पोलिस कर्मचारी दादा वसंत पवार याच्या मालकीचा निघाला. दरम्यान, ट्रकचालक प्रेमदास नामदेव जाधव (२७, रा. अंबड) याच्यावर कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिस आयुक्तांनीही माहिती मागवली आहे. ट्रकमालक पोलिस कर्मचारी असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नेहा जोशी यांचे पाय चिरडणारा ट्रक पोलिस कर्मचारी जाधव यांच्या नावावर असल्याचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी सांगितले. वाळूचा ट्रक पायावरून गेल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. डावा पाय पूर्ण निकामी झाल्याने तो काढून टाकण्यात आला, तर बुधवारी रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया करून हेडगेवार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उजवा पाय वाचवला, असे जोशी यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

यंत्रणा खडबडून जागी
शहरात राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने घुसखोरी करतात. सहा महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तांनी जड वाहनांना वर्दळीच्या वेळी शहर प्रवेशाला बंदी आणूनही असे प्रकार सुरूच आहेत. या अपघातानंतर मात्र पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक, सहायक आयुक्त आणि उपायुक्तांना कडक सूचना देण्यात आल्या. ज्या ट्रकने बुधवारी महिलेला चिरडले तो कुठल्या मार्गे आला, कुठल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आला, किती चौकांतून आला आणि त्या वेळी कोणते कर्मचारी कार्यरत होते याची माहिती आयुक्तांनी मागवली आहे.

पोलिसांचा साइड बिझनेस
शहरातील अनेक पोलिसांच्या अॅपेरिक्षा, जीप ट्रक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे अवजड वाहने कुठालीही वेळ पाळता शहरात घुसवण्याचे प्रकार घडतात. शहरातील एमआयडीसी वाळूजसह इतर दोन पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांकडे वाळूचे ट्रक असल्याची माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...