वाळूज - पुण्यातील फरासखाना भागातील बॉम्बस्फोट प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत असल्याचे रविवारी उघड झाले. पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वाळूज परिसरातून दोघांना अटक केली. या प्रकरणात वापरण्यात आलेले टाटा डोकोमोचे मोबाइल सिमकार्ड रांजणगाव शेणपुंजी येथील मोबाइल शॉपमधून विकण्यात आले. ग्राहकाचे आधार कार्ड आणि फोटो घेऊन अनोळखी व्यक्तीला सिमकार्ड विकणाऱ्या प्रकाश गलांडे आणि टाटा डोकोमोचा अॅक्टिव्हेशन अधिकारी सय्यद अासिफ सय्यद अब्बास यांना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी गंगापूर न्यायालयाने दोघांना सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एटीएस त्यांची चौकशी करत आहे.
स्लीपरसेल सक्रिय : भारतातदहशतवादी कारवाया करणाऱ्या लष्कर- ए- तोएबाने देशभर स्लीपर सेल तयार केला आहे. त्यात सर्वसामान्य माणसांची डोकी भडकवून त्यांचा दहशतवादी कारवायांसाठी अप्रत्यक्ष वापर करून घेतला जात आहे. एटीएस त्या सेलमध्ये काम करणाऱ्यांचा शोध घेत आहे.