आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या तरुणीवर रेल्वेस्थानकात अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरातून रुसून औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आलेल्या १८ वर्षांच्या युवतीवर २३ जूनच्या मध्यरात्रीनंतर अतिप्रसंग झाल्याची घटना २५ जूनला उघड झाली. ही मुलगी पुण्याहून आली होती. पीडित तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या फिर्यादीवरून रेल्वे पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी काही दिवसांपूर्वी शहरात आली होती. ती रेल्वेस्थानकातील विश्रामगृहात झोपत होती. १० जून रोजी तुळजापूर येथून आणखी एक १७ वर्षांची मुलगी आई-वडिलांशी भांडण करून रेल्वेस्टेशनला आली. हीदेखील पीडित मुलीसोबत राहू लागली. दरम्यान, दोघींची मैत्री झाली. २३ जूनच्या मध्यरात्री पीडित मुलगी बाजूलाच असलेल्या गोदामाकडे गेली. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही म्हणून तिला पाहण्यासाठी तिची मैत्रीण गेली. गोदामाजवळ ती विचित्र अवस्थेत पडलेली दिसून आली. तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. मात्र, पीडित मुलगी गायब असून पोलिस आरोपी व तिचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...