आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरे यांनी स्वत:हून पुरस्कार नाकारावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- राज्यभरातसंभाजी ब्रिगेड बाबासाहेब पुरंदरेंना घोषित झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याची मागणी करत असून या पुरस्कारासाठी होणारा विरोध पाहता पुरंदरे यांनी हा पुरस्कार स्वत: घेऊ नये तसेच शासनानेही हा पुरस्कार त्यांना देऊ नये. नसता आम्ही शिवसन्मान जागर परिषदेच्या माध्यमातून विरोध आणखी तीव्र करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पैठण येथे रविवारी आयोजित शिवसन्मान जागर परिषदेत दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय वाघचौरे होते. डॉ. पंडित किल्लारीकर, सोमेश्वर आहेर, राजू गायकवाड, गणेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजागर परिषद पार पडली.
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, पुरस्कार कोणाला दिला हे एकजात पाहता त्या व्यक्तीचे काम पाहून दिला जावा, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. पुरंदरे यांचा इतिहासाशी काही संबंध नाही, तरीही सरकार त्यांना इतिहासकार म्हणून कसा पुरस्कार जाहीर करते, असा प्रश्न शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांना पडला आहे. लोकजागृती करून आम्ही पुरंदरे यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणत आहोत. त्यात कोण्या एका जातीला लक्ष्य करण्यासाठी आम्ही काम करत नाहीत. ही शिवसन्मान जागर परिषद आता तालुक्यातून गावागावांत आयोजित करण्यात येईल, असे मिटकरी यांनी सांगितले.

या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी आपल्या भाषणात सरकार हे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात सत्तेवर आले. मात्र, आता ते महाराजांची बदनामी करणाऱ्यांची बाजू घेत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारमधील ग्रेट मराठे आता कुठे गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांनी रद्द केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या जागर परिषदेसाठी भाऊसाहेब पिसे, हरिभाऊ शेळके, रमेश गायकवाड, नंदकिशोर मगरे, अशोक बरडे, अनिल घोडके, चंद्रकांत बनसोडे, गणेश शिंदे, अर्जुन मोरे, कृष्णा मापारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पक्षनेत्यांनी पाठ फिरवली
याशिवसन्मान जागर परिषदेसाठी विविध राजकीय पक्षांतील नेत्यांना प्रमुख म्हणून बोलावण्यात आले. यात नुकतेच भाजपत प्रवेश करणारे तुषार शिसोदे यांना उद््घाटक म्हणून, तर शिवसेनेचे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विलास भुमरे, सचिन घायाळ यांच्यासह संघटना राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांना येथे बोलावण्यात आले. मात्र, आपल्या राजकीय पक्षाच्या भूमिकेमुळे या नेत्यांनी जागर परिषदेला येणे टाळले. जे आले नाही त्यांना शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नसल्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.