आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PWD Office Contractor Fighting To Explicative Engineer

ठेकेदारांची कार्यकारी अभियंत्यांना मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ठेकेदारांना धनादेश देताना अडवणूक केली जाते, असा आरोप करीत कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या केबिनमध्ये मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (28 जानेवारी ) सायंकाळी घडला.

पदमपुरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर मोरे तीन दिवसांच्या सुटीनंतर कार्यालयात कामकाज करीत होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कंत्राटदार धनंजय मिसाळ काही ठेकेदारांसोबत मोरे यांच्या केबिनमध्ये धनादेशाच्या चौकशीसाठी घुसले. माझ्या परवानगीशिवाय कसे आत आलात, असा सवाल मोरे यांनी ठेकेदारांना करताच बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. हा प्रकार कार्यालयाच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. तथापि, कार्यकारी अभियंत्यांनी अद्यापही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

ठेकेदारांच्या गैरकृत्यांना लगाम लावल्यानेच सर्वांच्या पोटात दुखत आहे. सर्वांच्या दुकानदार्‍या बंद झाल्यानेच आजची घटना घडलेली आहे. माझ्याकडे आलेले ठेकेदार नसून दलाल आहेत.
मधुकर मोरे, कार्यकारी अभियंता

कार्यकारी अभियंता ठेकेदारांची पिळवणूक करीत आहेत. टक्केवारीची अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असून यापुढे आम्हाला ते शक्य नाही, असे सांगताच त्यांनीच आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
धनंजय मिसाळ, ठेकेदार