आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांना पात्रता परीक्षा सक्तीची, संस्थांच्या मनमानीला बसणार वेसण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली असून आगामी शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शिक्षकांसाठी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) सक्तीची करण्यात आली आहे. या सक्तीमुळे अनुदानित व विनाअनुदानित संस्थांच्या मनमानी शिक्षक भरतीला आळा बसणार आहे.


शिक्षण विभागाची परवानगी न घेता परस्पर जाहिरात देऊन जूनमध्येच शिक्षक भरती केलेले संस्थाचालक व शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत येणार आहेत. कारण ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011’ च्या कलमानुसार केंद्र शासनाने 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे पदावर नियुक्तीसाठी पात्रता सेवा, शर्ती ठरवण्यासाठी राष्‍ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीईटी) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांकरिता किमान अर्हता निश्चित केली आहे. व तसेच टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) अनिवार्य केली आहे.