आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वॉलिटी इंजिनिअरिंगसाठी यादव कमिटीच्या सूचना;क्लास प्रॉडक्शन हवे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभियांत्रिकी महाविद्यालयात कमी होणारी विद्यार्थी संख्या आणि वाढलेली महाविद्यालये यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी झाली आहे. अभियांत्रिकीलाही डीटीएड आणि बीएडप्रमाणे उतरती कळा लागली आहे. त्यासाठी मर्यादित महाविद्यालय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरावी लागेल, अशा सूचना यादव कमिटीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला केल्या आहेत.

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यभरात अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यात यंदा केवळ तीनच फे-या घेण्यात आल्या. महिनाभर प्रक्रिया राबवत समुदपदेशन फेरीतही चार दिवस देण्यात आले होते, तरीदेखील राज्यातील सर्व महाविद्यालये मिळून 61 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे राज्यातील काही संस्थांनी स्वत:च पुढाकार घेत महाविद्यालये आणि ब्रँच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातीलही दोन महाविद्यालयांचा समावेश आहे.
या रिक्त राहणा-या जागांबाबत आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमावर यादव कमिटीने राज्यशासनाला 23 सूचना केल्या आहेत. या सूचना अमलात आणल्या तर क्वॉलिटी एज्युकेशन देता येईल, असेही यादव कमिटीने म्हटले आहे.

यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेदरम्यान करण्यात आलेल्या काही बदलांमुळेदेखील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. उशीरा सुरू होणारी प्रक्रिया, त्यात पुन्हा आयआयटी आणि एनआयटीसाठी जाणारे विद्यार्थी दोन्ही ठिकाणी प्रवेशासाठी नोंदणी करतात, परंतु आयआयटीला आणि एनआयटीला प्रवेश मिळाल्यावर तिकडे निघून जातात. त्यासंबंधीदेखील योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण आपल्याला प्रवेश मिळेल की नाही, या विचारामुळे ब-याचदा पालकही विद्यार्थ्यांचा आधीच प्रवेश निश्चित करून घेतात. त्यामुळे सीओईपीचा वापर करत ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत अशांना प्रवेश मिळून जातो, परंतु जास्त गुण असणारे विद्यार्थी पात्र ठरू शकत नाहीत. दरम्यान, 14 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.