आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी भाजपमध्ये आताच साठमारी, बदनाम करण्यासाठी वातावरण निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीतील सत्तावाटपाच्या करारानुसार ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच आणखी सहा महिन्यांनी शहराचे महापौरपद भारतीय जनता पक्षाकडे येणार आहे. गत पंचवार्षिकमध्ये सत्तेत असूनही भाजपला महापौरपद मिळाले नव्हते. साडेसहा वर्षांनंतर एक वर्षासाठी महापौरपद या पक्षाकडे येणार असल्याने त्या पदावर विराजमान होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस असणे साहजिकच आहे, परंतु संभाव्य प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून बाद करण्यासाठी इच्छुक नगरसेवकांत चढाओढ तसेच एक-दुसऱ्याच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा ‘खो-खो’चा खेळही सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी विद्यमान महापौर राजीनामा देतील अन् त्यानंतर निवडणूक घोषित होईल. खरेतर त्यानंतरच भाजपकडून स्पर्धेत कोण याची चर्चा अपेक्षित आहे. आपल्याकडे महापौरपद येण्यास आणखी किती अवधी आहे, याचे मोजमाप पक्ष नेत्यांनीही अजून केलेले नाही. मात्र भाजपमधील इच्छुक नगरसेवकांना याची घाई झाल्याचे दिसते. ज्येष्ठ नगरसेवकांनी तर आतापासूनच फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मीच कसा सरस उमेदवार असेल, असे यातील काही मंडळी आपणहून सांगू लागली आहेत. त्याचबरोबर दुसरा संभाव्य उमेदवार कसा कमी पडतो, त्याची पक्षनिष्ठा कशी खोटी आहे, अशी टीका केली जात आहे.

हा त्या गटाचा, तो या गटाचा, त्याच्या गटाची चलती नाही, माझ्या गटाची चलती आहे, असेही सांगितले जाते. महानगरपालिकेचे सभागृह असो की पक्षाचा जाहीर कार्यक्रम तेथे नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांत हीच चर्चा आहे. एक दुसऱ्यावर आरोप करताना पातळीचेही भान राहत नसल्याने आगामी काळात पक्ष नगरसेवकांत जोरदार शब्दयुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढे वाचा... वर्षभरासाठीच मिळणार संधी, तरी स्पर्धकांत सुंदोपसुंदी
बातम्या आणखी आहेत...