आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणारा ..रांझणा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लव्ह स्टोरी आणि बॉलीवूडचे अतूट नाते आहे. प्रेक्षकांना हीरोच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करून सिनेमा पाहण्यात एक वेगळा आनंद मिळतो. ‘रांझणा’ची कथा ही अशीच आहे. प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणारी. कुठलीही अट किंवा शर्त न ठेवता आपल्या प्रेयसीवर जिवापाड प्रेम करणार्‍या प्रियकराची ही कथा. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

चित्रपटाची कथा, सिनेमेटोग्राफी आणि अभिनय या सगळ्यांना फुल टू मार्क आहे. कौतुक आहे ते आनंद राय दिग्दर्शकाचे. मुस्लिम समाजातील मुलगी आणि हिंदू घरातला मुलगा यांची प्रेमकहाणी पडद्यावर दाखवणे हे तेवढेच धाडसाचे काम आहे. शिवाय अक्षरश: तारेवरची कसरत आहे. मात्र, चित्रपट प्रेमाशिवाय कुठेच सरकत नाही. टॉलीवूडमध्ये जादू असणार्‍या धनुषने बॉलीवूडमध्ये धम्माल केली आहे. चॉकलेट हीरोसारखा चेहरा जरी नसला तरी प्रत्येकाला आपला वाटणारा हा निरागस हीरो आहे. सोनम कपूर सध्या फुल फॉर्मात आहे. अभय देओल, स्वरा भास्कर, मोहंमद झिशान यांच्या भूमिकाही लक्षात राहण्यासारख्याच आहेत.

काय आहे कथा ? : बनारसचा छोरा कुंदन शाळेत असतानाच झोया नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम जडते. प्रत्येक प्रेमकथेतील लव्ह ट्रँगल या कथेतही आहे. बनारस आणि दिल्ली या दोन्ही शहरांत घडत असलेली कथा आणि त्या भागातील परफेक्ट पकडलेली स्टाइल प्रेक्षकांना कथेत घेऊनच जाते. विशेष म्हणजे दिग्दर्शकाने आजच्या राजकारणावर अनेक पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे संवाददेखील प्रभाव टाकणारे आहेत. सेकंड हापपेक्षा सिनेमाचा पहिला भाग जास्त मनोरंजक आहे. मात्र, क्लायमॅक्सची उत्सुकता लागूनच राहते. चित्रपटाचे संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले आहे. एकंदरीतच तिकिटाचे पैसे वसूल होणार यात शंकाच नाही.

मराठीतही प्रेमसूत्र
प्रेमाची वेगळी कहाणी आणि सूत्र सांगणारा ‘प्रेमसूत्र’ही मराठीत शुक्रवारी रिलीज झाला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि क्षितिज इंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, लोकेश गुप्ते, र्शुती मराठे, इला, भाटे, प्रदीप आठवले, शिशिर शर्मा, शुभा खोटे आदी मंडळी आहेत.