आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 किमी ताशी वेगाने विनाइंजिन गाड्या धावणारी रेस; विजयासाठी वेगासह क्रिएटिव्ह असणे गरजेचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या राजधानीत नुकतेच वार्षिक रेडबुल सोपबॉक्स रेसिंग चॅम्पियनशिपचे आयोजन झाले होते. जगभरातील १०० पेक्षा अधिक संघ यात सहभागी झाले. यात सहभागी झालेल्या गाड्यांना इंजिन नसते हे या रेसचे वैशिष्ट्य आहे. हो, स्टिअरिंग आणि ब्रेक असणे गरजेचे आहे. गाड्यांना वेग देण्यासाठी रेसची सुरुवात उतारावरून सुरू होते. जवळपास ५०० मीटरच्या ट्रॅकवर एकेक करून सर्वच संघ लॅप पूर्ण करतात. साधारणपणे गाड्या ताशी ५० किमी वेगाने धावतात. सर्वात कमी वेळ घेऊन लॅप पूर्ण करणारा यात विजेता होईल हे गरजेचे नाही. यासाठी टायमिंगसह गाडीचे मॉडेल, ड्रायव्हरचा ड्रेस आणि रेस पूर्ण करण्यासाठी क्रिएटिव्ह पद्धत वापरली आहे का, हेसुद्धा लक्षात ठेवून गुण दिले जातात.  
बातम्या आणखी आहेत...