आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडफेकीत तीन वाहनांचे नुकसान; बदनापुरातील घटनेचे पडसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बदनापूर येथील घटनेचे पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. सेंट्रल जकात नाका परिसरात अज्ञातांनी मनपाचे वाहन आणि इतर तीन वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सेंट्रल नाक्यासमोर असलेल्या पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयाजवळून दुपारी सव्वादोनच्या सुमारास शेंद्रा येथील ज्ञानदेव वामनराव कस्तुरे हे सेव्हन हिल्सकडून सिडकोतील बजरंग चौकाकडे इनोव्हा कारने (एमएच 20 पीएच 6262) जात होते. त्याच वेळी कारवर दगडफेक करण्यात आली. दुसर्‍या एका घटनेत याच परिसरात उभ्या असलेल्या मनपाचा ट्रक (एमडब्ल्यू 1949) आणि टिप्परच्याही (एमएच 30 एल 1783) काचा फोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. दगडफेकीत कस्तुरे यांच्या कारचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल करीत आहेत.