आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये गेलेले शहरातील रडके कुटुंब सुरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील देवानगरी येथे राहणारे कॅप्टन संजय रडके, त्यांची पत्नी सरिता रडके आणि श्रद्धा रडके हे पर्यटनासाठी नेपाळला गेले असून ते सुरक्षित असल्याचे हेरंब ट्रॅव्हल्सचे संचालक मंगेश कपोते यांनी सांगितले. शनिवारी सकाळी त्यांनी भारताची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच नेपाळमधून एक ग्रुप सुखरूप परतल्याचे हेरंब ट्रॅव्हल्सच्या संचालिका कीर्ती कपोते यांनी सांगितले.

अहमदाबादमध्ये भावेश सराफ : शनिवारी गुजरातेतील अहमदाबादमध्येही दुपारी पावणेबाराच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. त्या ठिकाणी शहरातील व्यावसायिक भावेश सराफ हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी परिवारासह गेले होते. कालुंधर भागात ते एका १२ मजली इमारतीत थांबले होते. पावणेबाराच्या सुमारास अचानक इमारत हादरली. बाहेरही आरडाओरडा सुरू होता. तत्काळ लहान मुलांना घेऊन आम्ही इमारतीतून बाहेर पडल्याचे भावेश सराफ यांनी सांगितले.