आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrisha Vikhe Patil Commented About BJP In Sillod

ढोंगीबाज भाजपला वठणीवर आणण्यासाठी दबाव आणू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- ढोंगी भाजप सरकारला वठणीवर आणण्यासाठी काँग्रेस सर्व बाजूंनी दबाव आणणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी बनकिन्होळा येथे सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांची व शेतजमिनीची राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. या वेळी आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन , माजी आमदार कल्याण काळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, प्रभाकर पालोदकर उपस्थित होते. अब्दुल समीर यांच्या वतीने निर्वासितांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वाटप केले.
विधानसभेत मांडणार प्रश्न
तालुक्यात १७ आणि १८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपद्ग्रस्तांना दिले. फुलंब्री येथील नदीकाठच्या घरांध्ये पुराचे पाणी शिरून घरासहित संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. या भागाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.